नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ज्या विषयांची परीक्षा उरलेली होती, त्याची तारीख आज (8 मे) जाहीर झाली आहे. 1 जुलै ते 15 जुलै या काळात या उरलेल्या विषयांची परीक्षा होणार आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर इतर अनेक परीक्षांप्रमाणे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांनाही त्यांचा फटका बसला होता.


सीबीएसईच्या  18 मार्चपर्यंतच परीक्षा व्यवस्थित पार पडल्या, त्यानंतर कोरोनाचं संकट ठिकठिकाणी वाढल्यानं या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सीबीएसईच्या एकूण 29 विषयांसाठीची परीक्षा उरलेली होती. ती आता 1 ते 15 जुलै या काळात होईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केलं आहे.





सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनियरिंगच्या प्रवेशासाठी नीट, जेईई परीक्षाही द्याव्या लागतात. त्यामुळे बोर्डाची ही परीक्षा जाहीर करताना या परीक्षांचं वेळापत्रकही लक्षात घेतलं गेलं आहे. नीटची परीक्षा 26 जुलै रोजी, तर जेईई मेन्स 18 ते 23 जुलै या काळात होणार आहे. जेईई अॅडव्हान्स ही 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे साधारणपणे ऑगस्टमध्ये सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागू शकतात. त्यानंतर पुढच्या वर्षाची शैक्षणिक प्रक्रिया सुरु होऊ शकते.


सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच परीक्षा


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, इंजिनियर, आर्किटेक्टचर, एमसीए, डिप्लोमा, एमए, एमकॉम, एमएस्सी यासारख्या सर्व परीक्षांच्या अंतिम वर्षच्या शेवटच्या सत्राची परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच परीक्षा होणार आहेत. प्रॅक्टिकल घेता आले नाही तर जर्नल सबमिशन केलेले आहेत. ऑनलाईन तोंडी परीक्षा घेतली जाईल. अशा पद्धतीने प्रॅक्टिकल घेऊ," असं उदय सांमत म्हणाले.


University Exams | पदवी, पदव्युत्तरच्या फक्त अंतिम सत्राचीच परीक्षा, अन्य वर्गांच्या परीक्षा रद्द, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा


संबंधित बातम्या :

विद्यार्थ्यांना दिलासा, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही!