एक्स्प्लोर
Advertisement
आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम, चंद्राबाबूंचा भाजपला इशारा
टीडीपी एनडीएमधील देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र टीडीपीने 2019 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्रपणे तयारी सुरु केली आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेपाठोपाठ भाजपप्रणित एनडीएतला आणखी एक पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राम राम करण्याची शक्यता आहे. तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
टीडीपी एनडीएमधील देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र टीडीपीने 2019 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्रपणे तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपसोबतची युती तोडण्याचे हे एकप्रकारे संकेत टीडीपीने दिले आहेत.
“भाजपला टीडीपीसोबतची युती हवीय, असे दिसून येत नाही. शिवाय, आम्हीसुद्धा (टीडीपी) स्वबळावर निवडणुका लढण्यास सक्षम आहोत.”, असे टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले.
काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेने कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. त्यामुळे आधीच 2019 सालच्या लोकसभेवेळी शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील मोठ्या पक्षाने स्वबळावर लढण्याचे घोषित केले आहे, त्यात आंध्र प्रदेशातील टीडीपीसारखा मोठा पक्षही बाहेर पडून स्वबळावर लढल्यास भाजपप्रणित एनडीएला मोठा धक्का असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement