कोलकाता : बंगालमध्ये निवडणुका आता कुठे रंगात आली आहे. प्रचार सभा, प्रचार रॅली, कॉर्नर मीटिंगपासून ते प्रत्यक्ष भेटीगाठीवर कार्यकर्ते आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.  पश्चिम बंगालच्या या निवडणुकीत महिला कोणाच्या बाजूनं उभा राहतील याची अधिक चर्चा आहे आणि याच मतावर तृणमूल आणि भाजपाचा डोळा आहे . 'बांगला निजेर मेकेई चाय...' म्हणजे  मराठीत बांगला आपल्या धरतीतल्या मुलीला पसंती देणार असे घोषवाक्य तयार करून ममता निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत तर भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यात महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे .


बंगालमधील सुधारीत मतदार यादीनुसार, 7.18 कोटी मतदारांपैकी 3.15 कोटी म्हणजेच सुमारे 49 टक्के महिला आहेत. ही आकडेवारी इतकी मोठी आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. असे म्हणणे योग्य ठरेल की या विधानसभा निवडणुकीत सत्तेची गुरुकिल्ली फक्त महिलांच्या हाती आहे.


देशातील इतर राज्यांप्रमाणे, बंगालच्या महिला केवळ पती किंवा घरातील प्रमुख यांच्या सूचनेनुसार मतदान करत नाहीत.  राजकीयदृष्ट्या जागरूक या स्त्रियांचा स्वतःचा विचार देखील असतो तर काही विभाग वगळता बहुतेक घरातच महिला स्वत: च्या मतांचा निर्णय घेतात.


पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप महिला मतदारांचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नात महिलांशी संबंधित मुद्दे उपस्थित करीत आहेत. राज्यातील मतदारांमधील पुरुषांमधील स्त्रियांचे प्रमाण गेल्या वर्षी प्रति हजार 956 च्या तुलनेत 961 पर्यंत वाढले आहे. ही एक नवीन नोंद आहे.


महिलांच्या मत आपल्याकडे वळवण्यासाठी ममता-मोदींमध्ये चढाओढ
आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वीच महिलांच्या सुरक्षेबाबत ममता आणि पंतप्रधान मोदी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालेल आपण पाहिलं. महिला मतदारांना भुरळ घालण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करण्यासाठी ममतांनी कोलकाता येथे मोर्चा काढला. महिला सुरक्षेच्या नावाखाली पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. आजही ममता बॅनर्जी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी गुजरात आणि उत्तर प्रदेशची नावे घेतली आणि सांगितले की बंगालपेक्षा तेथे जास्त गुन्हे आहेत.


यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महिलांना प्राधान्य देत आहेत आणि त्याअंतर्गत त्यांनी यावेळी 50 महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे.  दुसरीकडे, भाजपनेही आपला महिला मोर्चा राज्यात रस्त्यावर उतरवला आहे. भाजपा 85 वर्षांच्या वृद्ध महिलेला मारहाण करण्याचा मुद्दा उपस्थित करीत असून महिलांच्या सुरक्षेवर ममतांना घेरण्याचा प्रयत्न केलाय . त्याचबरोबर ममता यूपीमधील हाथरस आणि बिहारमधील महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांची दाखला देत आहेत.


भाजपला विश्वास की मतदार शांत राहून भाजपला मतदान करतील
भाजपला विश्वास आहे की महिला यावेळी ममता यांना नव्हे तर पंतप्रधान मोदींची  मेहनती प्रतिमा पाहून मतदान करतील. बिहार निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी असा दावा केला होता की महिला भाजपच्या मूक मतदार आहेत आणि त्यांना नेहमी विजयाच्या उंबरठ्यावर आणतात. पंतप्रधान म्हणाले की, भाजपाकडे मूक मतदारांचा असा वर्ग आहे, ते वारंवार आणि पुन्हा मतदान करतात. हे मूक मतदार म्हणजे देशातील माता-भगिनी, देशाची महिला शक्ती.


केंद्राच्या उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन आणि जल जीवन अभियान यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिला मतदारांना आपल्या बाजूने मिळता येईल, अशी भाजपला आशा आहे.


ममता आणि मोदींची वेगवेगळ्या योजनेतून भुरळ घालण्याचा प्रयत्न
2006 -07 पर्यंत राज्यातील महिला डाव्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या. पण सिंगूर आणि नंदीग्राममधील भूसंपादनाविरोधी चळवळींनंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देऊ लागला.  महिला मतदारांमध्ये आपल्या हातून जावू नयते म्हणून टीएमसी नेत्या ममता यांनी महिलांच्या कल्याणासाठी ज्या योजना राबविल्या त्या योजनांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत.  गेल्या वर्षी राज्य सरकारने दहा वर्षांच्या कामांबाबत जारी केलेल्या पुस्तिकाचे राज्यभरात घराघरात वितरणही करण्यात आले आहे.


सरकारी आकडेवारीनुसार बालविवाह रोखणे आणि मुलींमध्ये शिक्षणास प्रोत्साहन देणे या उद्देशाने सुरू केलेल्या कन्याश्री योजनेत आतापर्यंत अनेक मुलींचा फायदा झालाच सरकार सांगतंय. त्याचप्रमाणे लग्नाच्या प्रसंगी मुलींना  25 हजारांची मदत उपलब्ध करून देणा-या रूपश्री योजनेचा लाभ तरूणींना मिळाल्याचा दावा सरकार करत. अलिकडच्या वर्षांत  योजना सुरू करण्याव्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी महिला पदवी महाविद्यालय आणि विद्यापीठ देखील स्थापन केले.


भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी बरच काही
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बंगाल निवडणुकीसाठी भाजपचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनामा पत्रात बंगालला सोनार बंगला बनवणार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.  भाजपच्या या जाहिनामा पत्रात महिलांवर बरेच लक्ष केंद्रित केले गेले आहे. सरकारी नोकरीत 33% महिला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.


भाजपनं दिल भांडी घासण्याचे काम करणाऱ्या महिलेला तिकीट
पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले जाईल. त्याचबरोबर यापूर्वीही राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना तिकीट देत आहेत. मात्र या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिकिट वितरणात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. या निर्णयापैकी एक म्हणजे या वेळी विधानसभा निवडणुकीत भाजपाने अशा स्त्रीला उमेदवार बनवून दिले आहे जी भांडी घसण्याचे करण्याचे काम करते. पश्चिम बंगाल निवडणुकीत या वेळी भाजपामध्ये भांडी घासणार्‍या एका महिलेला भाजपचे उमेदवार करण्यात आलं आहे.  या महिलेकडे फक्त 6 साड्या असून तिचे उत्पन्न सुमारे 3 हजार रुपये आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट दिलेले तिचे नाव कलिता माझी असं आहे.  गेल्या दोन दशकांपासून कालिता भांडी घसण्याचे काम करतात. ती एका शेतकर्‍याची मुलगी आणि प्लंबरची बायको आहे.


 2016 च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत किती महिलांना तिकीट दिल होत? 
2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने  45  महिला उमेदवारांना तिकिटे दिली होती, तर भाजपने  31 महिलांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं होतं.  त्याच वेळी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 5 आणि टीएमसीने 17 महिला उमेदवार उभे केले.


त्यामुळे खेल्ला होबे म्हणणाऱ्या ममतांचा खेळ होणार की भाजपचा, याचं उत्तर निवडणुकीच्या निकालानंतर मिळेल. एवढं मात्र निश्चित आहे की पश्चिम बंगाल निवडणुकीत सत्तेची गुरुकिल्ली फक्त महिलांच्या हाती आहे.



महत्वाच्या बातम्या :