मुंबई : साहसी खेळांचा अनुभव घेण्याची अनेकांचीच इच्छा असते. पण, प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी या खेळांमध्ये किंवा एखाद्या प्रात्यक्षिकात सहभागी होण्याची वेळ येते, तेव्हा मात्र अनेकांचेच धाबे दणाणतात. हिमाचलच्या कुल्लू येथे पॅराग्लाईडिंग करण्यासाठी गेलं असता उंच नभात असतानाच दचकून अचानक जोरजोरात ओरडणारा तो तरुण तुम्हाला आठवतोय का? 


दोन वर्षांपूर्वीच ही घटना घडली, ज्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी हिमाचल प्रदेशमधीलच खज्जीआर येथील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी अक्षरश: जीवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे. 


Beauty Tips | Priyanka Chopra च्या सौंदर्याचं गुपित? स्वत: शेअर केल्या टिप्स!


पॅराग्लाईडिंग करत असताना ही तरुणी इतकी जास्त घाबरून ओरडू लागली की, एका तिनं तिचे डोळेच मिटून घेतले. ज्यामुळं उंचावरुन तिला या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्यालाही न्याहाळता आलं नाही. धीरे चलाओ... असं ती या व्हायरल व्हिडीओमघ्ये जोरात किंचाळताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 






सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओच्या निमित्तानं लँड करा दो, असं म्हणत पॅराग्लाईडिंगसाठी सोबत असणाऱ्या गाईडकडे विनवणी करणारा आणि उंचीला कमालीचा घाबरलेला तो तरुणच आठवला. विपीन साहू असं त्या तरुणांचं नाव असून, 2019 मध्ये त्याच्या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.