Russia-Ukraine War : गेल्या पाच दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) युद्ध सुरू आहे. त्यामुळे तिथे भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास महिनाभर सुरू असलेल्या तणावानंतर मागील गुरुवारी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. अशातच या युद्धाचा सर्वाधिक फायदा चीनला होणार असून सुरक्षेसाठी भारतानं काय भूमिका घेतली पाहिजे? याबाबत लेफ्टनंट जनरल व्ही जी खंडारे, फॉर्मर मिल्ट्री ॲडव्हाजर NSCS (national security Council secretariat ) यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तेव्हा त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिलीय. काय म्हणाले खंडारे?


भारताची भूमिका प्रॅक्टीकल हवी


रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाची संपूर्ण माहिती समोर येण्यासाठी आणखी काही वेळ जाईल. कारण दोन्ही देश सोईस्कर पद्धतीने आपल्या बाजू माध्यमातून मांडत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांची देखील यात आपली एक अशी बाजू आहे. रशिया आणि युक्रेन दोन्ही देश भारताला शस्त्रे पुरवतात. रणगाड्यांची इंजिन्स, हेलिकॉप्टरचे पार्टस, अंतराळ मोहिमांना लागणारे साहित्य हे या दोन देशातून येते. त्यामुळे भारताची भूमिका प्रॅक्टीकल हवी. असं लेफ्टनंट जनरल व्ही जी खंडारे यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले. 


युद्धाचा सर्वाधिक फायदा चीनला
लेफ्टनंट जनरल व्ही जी खंडारे म्हणाले,  यु ए एस आर च्या विघटनानंतर युपीपोलर झालेले जग पुन्हा बायपोलर होतेय. जग मल्टीपोलर झाल्याचे वाटत असले तरी ते दोन धृवीयच होतेय. कारण रशिया आणि चीन एकाच बाजुला उभे आहेत. या युद्धाचा सर्वाधिक फायदा चीनला होणार आहे. चीन आणखी ताकतवर बनेल. रशियाच्या धोरणाला चीनचा पाठींबा आहे. या परिस्थितीत भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी चीनवरील अवलंबून राहणं कमी करावे लागेल. देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागेल. या युद्धानंतर पेट्रोलियमचे दर वाढणार आहेत. त्यासाठी रिनोएबल एनर्जीचा वापर वाढवावा लागेल. नेटोच्या दहा नॉन पर्मनन्ट सदस्य देशांमधे भारत आहे. तिथे भारत काय भूमिका घेतो हे महत्वाचे ठरणार आहे. 


रशिया आणि चीन मजबूत झालेत


खंडारे म्हणाले,  अमेरिका पूर्वीसारखी मजबूत राहिलेली नाही असं म्हणण्याऐवजी रशिया आणि चीन मजबूत झालेत असं म्हणायला हवं.आपल्याला रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे एवढेच दिसतेय पण त्यामागे अनेक गोष्टी घडल्यात. यु एस एस आर च्या विघटनानंतर रशियाला नाटोच्या माध्यमातून घेरण्याचा प्रयत्न झाला.


सैन्याचा martyrs हा शब्द वगळण्याचा निर्णय


सैन्याने martyrs हा शब्द वगळण्याचा निर्णय घेतलाय.  कारण हा शब्द एका विशिष्ट धर्मासाठी बलिदान देण्यासाठी वापरला जातो. कोणत्याही डिक्शनरीत पाहिले तरी martyrs चा अर्थ हा धर्मासाठी बलिदान देणारा असाच आहे. भारतीय सैन्य हे कोणत्या धर्मासाठी लढत नाही तर देशासाठी लढते. देश हाच सैन्याचा धर्म आहे. युरोपियन सत्तांनी वसाहतवादाच्या काळात त्यांच्या सैनिकांसाठी हा शब्द वापरला.  इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या वसाहती होत्या. ख्रिश्चन धर्मात धर्मासाठी लढताना शहीद होणाऱ्यांसाठी martyrs हा शब्द वापरला जातो. या देशांच्या जिथे जिथे वसाहती होत्या तिथे तो प्रचलित झाला. या शब्दाचा उगम ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यात झालेल्या युद्धांमधे आहे. भारतीय सैन्यात बर्‍याच वर्षांपासून हा शब्द वगळायला हवा असा विचार सुरु होता.या शब्दाऐवजी laid down किंवा बलिदान असे शब्द वापरता येतील. असे लेफ्टनंट जनरल व्ही जी खंडारे म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha