नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. कोर्टाने 2008 ते 2012 दरम्यानच्या पाचशेहून अधिक MBBS विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
व्यापम हा मध्यप्रदेशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. याप्रकरणात अनेकांचे जीव गेले आहेत.
व्यापम घोटाळ्यासंदर्भात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याशिवाय जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि एक महिला ट्रेनी कॉन्स्टेबलनं आत्महत्या करत स्वतःला संपवलं होतं. त्यामुळे या घोटाळ्यातील मृतांचा आकडा 25 च्या घरात पोहोचला होता.
काय आहे व्यापम घोटाळा?
मध्य प्रदेशात व्यावसायिक परीक्षा मंडळाने (व्यापम) नोकरभरती केली होती. त्यावेळी सरकारकडून पैसे देऊन नोकऱ्या वाटल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचंही नाव आहे. व्यापम घोटाळा हा मध्यप्रदेशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं सांगण्यात येतं.
– सरकारी नोकरीत 1000 बोगस भरती
– मेडिकल कॉलेजमध्ये 514 बोगस भरतीचा आरोप
– भरतीप्रकरणात माजी मंत्री अटकेत
– याप्रकरणात हजारो जणांना अटक झाली
संबंधित बातम्या :
व्यापम घोटाळ्यातील मृत्यूंमुळे भीती वाटते: केंद्रीय मंत्री उमा भारती
व्यापम घोटाळ्याचा आणखी एक बळी? ओरछामध्ये पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू
व्यापम घोटाळा : 3 दिवसांत तिसरा बळी, व्यापम परीक्षेद्वारे भर्ती झालेल्या महिला पोलिसाची आत्महत्या
व्यापम घोटाळ्यातील मृत्यूंमुळे भीती वाटते: केंद्रीय मंत्री उमा भारती
व्यापम घोटाळ्याचा आणखी एक बळी? ओरछामध्ये पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू
व्यापम घोटाळा : 3 दिवसांत तिसरा बळी, व्यापम परीक्षेद्वारे भर्ती झालेल्या महिला पोलिसाची आत्महत्या
‘व्यापम’ घोटाळ्याचं रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराचा गूढ मृत्यू
मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणतात, “दारु पिणं हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार”
व्यापम घोटाळ्यातील आणखी 2 आरोपींचा मृत्यू, मृतांची संख्या 24 वर