हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो झाला. राहुल गांधींच्या या रोड शोमदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे फडकावत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

हरिद्वारमधील काँग्रेस उमेदवार आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या समर्थनासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रोड शो केला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चुडियालाहून रोड शो सुरु झाला. रोड शो अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूस भाजपचे कार्यकर्ते उभे होते. त्यांनी भाजपचे झेंडे फडकावत पंतप्रधान मोदींच्या घोषणा दिल्या.

राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान कडक सुरक्षाव्यवस्था होती. जवळपास एक हजारहून अधिक पोलिस तैनात होते. राहुल गांधींचा रोड शो सुमारे 90 किलोमीटरचा होता.

भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीकडे राहुल गांधी यांनी  दुर्लक्ष केलं आणि रोड शो दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद सुरु ठेवला.

“माझ्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्तेही आले, माझं स्वागत केलं, याचा मला आनंद वाटला. त्यासाठी त्यांचे धन्यवाद”, अशा शब्दात राहुल गांधींनी भाजप कार्यकर्त्यांना टोला लगावला.

https://twitter.com/ANI_news/status/830715180312965120