नवी दिल्ली: बीएसएफ जवान तेजबहादूर यादवनं फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केल्यानं मोठी खळबळ माजली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने बड्या अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्याचा हा व्हिडिओ 70 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून 4 लाख जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.


दरम्यान, तेजबहादूरच्या व्हिडिओनंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या सैनिकांना आणि शेतकऱ्यांची देखभाल करणं गरजेचं आहे. खाण्याची योग्य व्यवस्था झाली पाहिजे.' असं म्हणत सेहवागनं ट्विटमध्ये #Food4Soldiers  असा हॅशटॅग केला आहे.


सेहवागच्या आधी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील तेजबहादूरची पाठराखण केली आहे. शत्रुघ्न सिन्हानं ट्विटं केलं आहे. 'सैनिकांची अवस्था पाहून मी खूपच दु:खी आहे. या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हायला हवी.



दरम्यान, बीएसएफनं एक पत्रक जारी करुन म्हटलं आहे की, 'जवानांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम तत्पर असतो. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका उच्च अधिकाऱ्याला तिथं पाठविण्यात आलं आहे.