भोपाळ: भन्नाट डान्समुळे अल्पावधित लोकप्रिय होत, देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या डान्सर अंकलला, मध्य प्रदेशातील विदिशा महानगरपालिकेने मोठं गिफ्ट दिलं आहे.


डान्सर अंकल अर्थात प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांना विदिशा महानगरपालिकेने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं आहे.

संजीव श्रीवास्तव यांनी एका लग्न सोहळ्यात केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्या गोविंदास्टाईल डान्सवर लोक अक्षरश: फिदा झाले. संजीव श्रीवास्तव अल्पावधीतच प्रकाशझोतात आले आणि मीडियाची हेडलाईन्स बनले.

त्याचाच फायदा उचलण्यासाठी विदिशा महापालिकेने अचूक टायमिंग साधलं. संजीव श्रीवास्तव यांना विदिशा महानगरपालिकेने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं.

कोण आहेत डान्सिंग अंकल?

एका लग्नातील जबरदस्त डान्समुळे सोशल मीडिया सेंसेशन बनलेल्या या काकांचा पत्ता लागला. भन्नाट डान्स करणाऱ्या या काकांचं नाव संजीव श्रीवास्तव असून ते मध्य प्रदेशच्या विदिशात राहतात. डब्बू अंकल म्हणून त्यांना ओळखलं जातं. ग्वाल्हेरमध्ये 12 मे रोजी मेहुण्याच्या लग्नाच्या संगीतातील त्यांचा खुदगर्ज सिनेमातील आप के आ जानेसे या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला.

'आप के आ जाने से..' काकांचा गोविंदा स्टाईल भन्नाट डान्स 

नागपूर विद्यापीठ आणि नागपूरच्याच प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेले संजीव श्रीवास्तव भाभा इंजिनिअरिंग रिचर्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात.

मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदाकडून डान्सची प्रेरणा मिळाली. पण गोविंदाच्या गाण्यावर जास्त डान्स केले. कॉलेजमध्ये असताना स्टेजवर डान्स करायचो. पण 1998 मध्ये डान्स करणं बंद केलं होतं, असं संजीव श्रीवास्तव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. सध्याच्या काळात हृतिक रोशनचा डान्स आवडतो, तो कम्प्लिट डान्सर आहे. त्याच्या 'कहो ना प्यार है' गाण्याच्या स्टेपवर डान्स केला होता, असंही ते म्हणाले.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतत कॉल येत असल्याचंही संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

देशभर गाजणाऱ्या डान्सर अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव यांचं मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केलं. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन संजीव श्रीवास्तव यांचा व्हिडीओ शेअर केला. त्यासोबत लिहिलं, “विदिशात काम करणारे प्रोफेसर श्री संजीव श्रीवास्तवजी यांनी देशभरातील इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. विश्वास ठेवा अथवा नको, पण मध्य प्रदेशच्या पाण्यात काहीतरी खास आहे”, असं ट्विट शिवराजसिंह चौहान यांनी केलं.









संबंधित बातम्या 

गोविंदासारखा डान्स करणाऱ्या काकांचा पत्ता लागला!  

'आप के आ जाने से..' काकांचा गोविंदा स्टाईल भन्नाट डान्स