महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कृष्णा अग्रवाल हा तरुण देशात 7 वा आला असून, कृष्णाला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. तसेच, कृष्णा बायोलॉजी विषयात देशात पहिला आला आहे.
कृष्णाचे वडील आशिष अग्रवाल हे बालरोगतज्ज्ञ आहेत, तर आई डेंटिस्ट आहेत.
यंदाचा नीट परीक्षेचा कट ऑफ घसरला असून, जनरल कॅटेगरीसाठी यावर्षी 50 टक्के म्हणजे 720 पैकी 119 मार्क्स आहेत. मागच्या वर्षी हा कट ऑफ 131 होता. तर ओबीसी, एससी, एसटीसाठी हा कट ऑफ 40 टक्के म्हणजे 720 पैकी 96 मार्क्स असणार आहे, जो मागच्या वर्षी 107 होता.
यंदा 7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरले आहेत.
एक दिवस आधीच निकाल
MBBS, BDS या वैद्यकीय शिक्षणासाठी सीबीएसईकडून ही प्रवेश परिक्षा घेतली जाते. नीटचा निकाल 5 जून रोजी जाहीर होणार होता. मात्र एक दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला. वैद्यकीयसाठी नीट प्रवेश परीक्षा 6 मे रोजी घेण्यात आली होती.
परीक्षार्थी सीबीएसईच्या cbseneet.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.
सीबीएसईने 27 मे रोजी NEET 2018 ची ‘आन्सर की’ जाहीर केली होती. त्याचबरोबर, 27 मे पर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.