मुंबईत आजचा पेट्रोलचा दर 85 रुपये 77 पैसे आहे , तर डिझेल 73 रुपये 43 पैसे मिळतं आहे.
कर्नाटक निवडणुकीनंतर सलग 16 दिवस दररोज पेट्रोल पै-पैने वाढत होते. त्यानंतर 17 व्या दिवशी पेट्रोल 1 पैशांनी स्वस्त झालं. अवघ्या 1 पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याने, सरकारवर चहूबाजूंनी टीका झाली होती.
सलग 16 दिवस इंधनाच्या दरात घसघशीत वाढ झाल्यानंतर, सतराव्या दिवशी इंधन दर 60 पैशांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वासही टाकला होता, मात्र दुपारी तेल कंपन्यांनी कोलांटउडी मारली. इंधन दरात केवळ एक पैशांची कपात झाल्याचं सांगितलं. 60 पैसे म्हणजे टायपिंग मिस्टेक होती, असं कारण त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
सलग 16 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने नागरिक त्रस्त होते रोज पै-पै ने वाढ होत असली, तरी एकूण 16 दिवसांच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.8 रुपये तर डिझेलच्या दरात 3.37 रुपयांनी वाढ झाली होती.
मात्र आता आज पेट्रोल 15 पैशांनी आणि डिझेल 14 पैशांनी स्वस्त झालं आहे.
मुंबईतील पेट्रोलचे दर
1 जून - 86.10
2 जून- 86.01
3 जून- 85.92
4 जून - 85.77
पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास काय होईल?
पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचे विविध प्रकारचे कर आणि एक्साईज ड्युटी आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास हे सर्व कर रद्द होतील आणि जीएसटी स्लॅबमधील एकच कर यासाठी लागू होईल. जीएसटीमध्ये कराचे चार स्लॅब आहेत, ज्यामध्ये पाच टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के या स्लॅबचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
तेल कंपन्यांची गलती से मिस्टेक, पेट्रोलमध्ये 60 नाही तर 1 पैशांची कपात!
पेट्रोलच्या दरात सात, डिझेलच्या दरात पाच पैशांनी कपात
रोज पै-पै ने वाढणाऱ्या पेट्रोलची रुपयातील वाढ किती?
इंधन दरवाढीवर लवकरच दीर्घकालीन उपाययोजना : अमित शाह
पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राच्या हालचाली