मुंबई: नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. अगदी दिल्लीपासून गल्लपर्यंत याचीच चर्चा केली जात आहे. हे ऑपरेशन पूर्णपणे गोपनीय ठेवल्याचा दावा सरकारकडूनही करण्यात आला. पण सोशल मीडियावर सध्या एका फोटो व्हायरल झाला आहे. या फोटो मध्ये दोन वृत्तपत्रांचं नाव घेऊन दावा करण्यात येत आहे की, 2 हजारांची नवी नोट येण्यासंबंधी आणि नोटाबंदीबाबत पहिल्यांदाच बातमी छापण्यात आली होती.


सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत आहेत.



8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. अचानक जाहीर केलेल्या या निर्णयानं नागरिकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला होता. या निर्णयानंतर आरबीआयनं देखील स्पष्ट केलं की, या निर्णयाबाबत फारच कमी लोकांना माहिती होती. पण या निर्णयानंतर आता एक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे.

गुजराती वृत्तपत्रात सहा महिने पूर्वीच बातमी छापण्यात आली होती?

ही बातमी गुजरातीत लिहली असली तरीही संपू्र्ण देशात ही वायरल होत आहे. कारण की, 6 महिन्यांपूर्वी या गुजराती वृत्तपत्रात 2 हजारच्या नव्या नोटा छापण्यात आल्याची बातमी आली होती.



27 ऑक्टोबर 2016 रोजी दैनिक जागरणमध्ये देखील ही बातमी छापण्यात आली होती. यामध्ये देखील म्हटलं होतं की, 2 हजारची नोट येणार असून त्यामुळे काळ्या पैसा बाहेर येईल.

त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, खरोखरच गुजरातमध्ये 6 महिन्यापूर्वी याबाबत बातमी छापण्यात आली होती?

एबीपी न्यूजनं या बातमीचं व्हायरल सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ही बातमी खरोखरंच छापली होती? या वृत्तपत्रातील काही लोकांशी जेव्हा आम्ही संपर्क साधला त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, आम्ही ही बातमी मस्करी म्हणून छापली होती. कारण की त्या दिवशी एक एप्रिल तारीख होती आणि एप्रिल फूलसाठी आम्ही ही बातमी छापलेली. ही तारीख वृत्तपत्रावरही दिसत आहे.

गुजरातमधील वृत्तपत्रानं मस्करी म्हणून बातमी छापली होती. पण मग दैनिक जागरण बातमीचं सत्य काय? मोदींनी नोटाबंदीची घोषणा करण्याआधी अकरा दिवसांपूर्वी दैनिक जागरणनं बातमी छापली होती. जेव्हा एबीपी न्यूजनं दैनिक जागरणशी याबाबत चर्चा केली तेव्हा असं समजलं की, त्यांनी सुत्रांच्या हवाल्यानं ही बातमी खरोखर छापली होती.



गुजराती वृत्तपत्रानं ही बातमी मस्करी म्हणून छापली होती. आमच्या पडताळणीत ही बातमी अर्ध सत्य असल्याचं समोर आलं आहे.