एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : पंतप्रधान मोदी मशरुम खाल्ल्यामुळे गोरे?

गुजरात विधानसभेच्या प्रचाराच्या धुराळ्यात मोदींबरोबरच त्यांना गोरं करणारे कथित मशरुमही चर्चेत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रंग गोरा होण्यासाठी चक्क तैवानहून 4 लाख रुपयांचे मशरुम मागवतात, तसंच प्रत्येकी 80 हजार रुपये किंमतीचे एकूण पाच मशरुम दर दिवशी खातात, असा दावा काँग्रेसच्या अल्पेश ठाकोरनं केला. अल्पेशच्या या विधानानंतर मशरुमची बरीच चर्चाही सुरु झाली. मात्र, मोदी खरोखर मशरुम खातात का? मोदी मशरुम खात असले, तरीही मशरुमनं रंग गोरा होतो का? अशा अनेक प्रश्नांची पडताळणी ‘माझा’ने केली.

मुंबई : गुजरात विधानसभेच्या प्रचाराच्या धुराळ्यात मोदींबरोबरच त्यांना गोरं करणारे कथित मशरुमही चर्चेत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रंग गोरा होण्यासाठी चक्क तैवानहून 4 लाख रुपयांचे मशरुम मागवतात, तसंच प्रत्येकी 80 हजार रुपये किंमतीचे एकूण पाच मशरुम दर दिवशी खातात, असा दावा काँग्रेसच्या अल्पेश ठाकोरनं केला. अल्पेशच्या या विधानानंतर मशरुमची बरीच चर्चाही सुरु झाली.  मात्र, मोदी खरोखर मशरुम खातात का?  मोदी मशरुम खात असले, तरीही मशरुमनं रंग गोरा होतो का? अशा अनेक प्रश्नांची पडताळणी ‘माझा’ने केली. मशरुमशी निगडीत अनेक प्रश्न गुजरात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ऐरणीवर आले. अल्पेश ठाकोरनं गुजरातच्या बसानकांठातील जाहीर सभेत मशरुमवरुन मोदींवर निशाणा साधला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. अल्पेश ठाकोर यांच्या या आरोपांनंतर अनेकांना मशरुमविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही निर्माण झाली. अनेकांनी गुगल, सोशल साईट्सवरुन मशरुमची जणू शोधमोहीमच उघडली. मात्र या साऱ्या मोहिमेनंतरही काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले. खरोखरच मशरुन खाल्ल्याने कुणी गोरा होतो का? एक मशरुम 80 हजार रुपयांना मिळावं इतकं खरच ते मौल्यवान आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच तैवानहून मागवलेलं महागडं मशरुम खातात का? या साऱ्या अनुत्तरित प्रश्नांची पडताळणी एबीपी माझानं केली. यात विविध जाणकारांचं मतही माझानं विचारलं. बरीच माहिती गोळा केली. यात अनेक बाबी आमच्या निदर्शनास आल्या. यात युरोपपासून चीनपर्यंत मशरुमच्या शेकडो प्रजाती आढळतात. त्यातल्या काही जाती विषारीसुद्धा आहेत, ज्यामुळे माणसाचा मृत्यूही ओढवला जाऊ शकतो, असं आमच्या अभ्यासात समोर आलं. मात्र आम्ही त्या 80 हजार रुपयांच्या गोरं बनवणाऱ्या मशरुमच्या शोधात होतो. बरीच शोधाशोध केल्यानंतर तैवान आणि मशरुमविषयी निगडीत असणाऱ्या काही बाबी आमच्या समोर आल्या. तैवानमध्ये मशरुमचं पीक घेण्याची परंपरा फार जुनी आहे. जगात तैवानच मशरुमचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मात्र अल्पेश ठाकोर ज्या 80 हजार रुपयांच्या मशरुमचा दावा करत आहेत, त्याला एका भाजप नेत्याकडूनच चोख प्रत्युत्तर मिळालं आहे. भाजपचे नेते तेजिंदर बग्गां यांनी ट्विटरवरुन एका तैवानच्या महिलेचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्या महिलेने गोरं बनवणाऱ्या मशरुमचा दावा खोडून काढला आहे. मात्र, या महिलेचा व्हिडीओ भाजप नेत्याकडे कसा आला हे पाहण्यासाठी ‘माझा’ने तेजिंदर बग्गा यांची बाजूही जाणून घेतली. मशरुमच्या या प्रकरणात प्रत्येकाचे स्वत:चे दावे आणि प्रतिदावे होते. म्हणून आम्ही प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्याकडे पोहोचलो. मशरुमबाबत त्यांना बरीच माहिती आहे आणि शिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींसाठी अनेकदा जेवणही बनवलं आहे. शेफ संजीव कपूर यांनी मशरुमचा एक छोटासा तुकडा 80 हजार रुपयांचा असल्याची  बाब अमान्य केली. त्यामुळे अल्पेश ठाकूर यांचा पहिला दावा साफ खोटा ठरला. मात्र आता प्रश्न होता तो म्हणजे मशरुममुळे रंग गोरा होण्याचा. त्यासाठी आम्ही दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमधल्या त्वचा तज्ज्ञांशी चर्चा केली. या हॉस्पिटलमधील त्वचारोग तज्ज्ञ मुक्ता वशिष्ठ यांनी स्पष्ट केलं की, वारंवार मशरुम खाल्ल्यामुळे शरीर सदृढ राहतं, मात्र त्याचा रंग गोरा होण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आता प्रश्न उरला होता की अल्पेश ठाकोर यांनी कोणत्या आधारावर मशरुममुळे रंग गोरा होण्याचा दावा केला?.. .याची विचारणा आम्ही खुद्द अल्पेश ठाकोर यांच्याकडेच केली. मात्र प्रचाराच्या धुराळ्यात केलेल्या आरोपांवर अल्पेश ठाकूर कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत. एबीपी ‘माझा’च्या पडताळणीत अल्पेश ठाकोर यांचा दावा सपशेल खोटा ठरला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget