एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : अखिलेश यादव हे योगी आदित्यनाथ यांचे मेहुणे?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले. त्याचवेळी सोशल मीडियावर आदित्यनाथांविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. आदित्यनाथ आणि मुलायम सिंह यादव यांच्यामध्ये नातं असल्याचे दावे केले जात आहेत. 'एबीपी न्यूज'ने यामागील व्हायरल सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आदित्यनाथ हे मुलायम सिंह यादव यांच्या मोठ्या सूनबाई डिंपल यादव आणि धाकट्या सूनबाई अपर्णा यादव यांच्या नात्यात असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मेहुणे असल्याचं व्हायरल झालं आहे. काय आहे व्हायरल मेसेज? 'मुलायम सिंह यादव यांच्या दोन्ही सुना डिंपल आणि अपर्णा या ठाकूर कुटुंबातील आहेत. मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांच्या आत्याचा मुलगा म्हणजे अजय सिंह बिश्त. अजय सिंह बिश्त यांना योगी आदित्यनाथ म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे आदित्यनाथ हे अखिलेश यांचे मेहुणे लागतात. योगी हे पौडी गढवाल उत्तराखंडचे मूळ रहिवासी आहेत. आठ दिवस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवाराचा शोध घेतल्यानंतरही भाजपला समाजवादी पक्षाशी संबंधितच व्यक्ती मिळाली. अभिनंदन' असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. योगी आदित्यनाथ आणि मुलायम सिंह यांच्या कुटुंबात नातं असल्याचे दावे आश्चर्यचकित करणारे आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात दोघंही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये झाल्यामुळे अनेकांचा या मेसेजवर विश्वास बसत आहे. मुलायम यांच्या दोन्ही सुनांचेही उत्तराखंडशी संबंध आहेत. मात्र या व्यतिरिक्त दोघांमध्ये कोणते संबंध आहेत का, हे पाहण्यासाठी एबीपी न्यूजने व्हायरल मेसेजची पडताळणी केली. एबीपी न्यूजने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजची तपासणी करण्यासाठी थेट योगी आदित्यनाथ यांचंच घर गाठलं. या मेसेजमध्ये काही तथ्य आहे का, हा प्रश्न योगी आदित्यनाथ यांच्या आई-वडिलांना विचारला असता, त्यांनी तो साफ धुडकावून लावला. त्यामुळे साहजिकच योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यांच्यात नातं असल्याबाबत व्हायरल झालेला मेसेज सत्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Embed widget