एक्स्प्लोर

चायनिज वस्तूंच्या वापरा संदर्भातील पंतप्रधानांच्या पत्राचे व्हायरल सत्य

मुंबई: यंदाच्या दिवाळीपूर्वी देशात सर्वत्र चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं जात आहे. दिवाळीनिमित्त सोशल मीडियावरुन पंतप्रधान मोदींचे एक पत्रही कमालीचं व्हायरल होतंय. या पत्राद्वारे, चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन खुद्द पंतप्रधानांनी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना असे कोणतं आवाहन केलंय का? याचं व्हायरल सत्य जाणून घेऊ या. वास्तविक, या पत्राची चर्चा होण्याची दोन कारणे आहेत. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रं, आणि दुसरं दिवाळीनिमित्त मोदींचं आवाहन. या पत्राद्वारे पंतप्रधानांनीच चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्यानं, अश्चर्य व्यक्त होतंय. सोशल मीडियावरील हे पत्र वाचून अनेकजण विचारात पडले आहेत. कारण पंतप्रधानांनी अशी कोणतं आवाहन केलंय का? कारण, सध्या सोशल मीडियावरुन चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची एक मोहीमच सुरु आहे. या मोहीमेत पंतप्रधानांच्या नावच्या पत्राचाही आधार घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे पंतप्रधानांचे हे आवाहन खरं असल्याचं अनेकांना वाटत आहे. त्यामुळे एबीपी न्यूजच्या टीमने याची सत्यता पडताळली आहे. या पत्रात पंतप्रधानांच्या नावाने लिहलं आहे की, ''माझ्या प्रिय भारतीयांनो, तुम्ही फक्त इतकं करा! यंदाच्या दिवाळीत आपल्या घरात लायटिंग, सजावटीचे सामान, मिठाई आदींमध्ये भारतीय वस्तू आणि पदार्थांचा वापर करा. तुम्ही सर्वजण या प्रधान सेवकाचं म्हणणं जरुर मानाल, अशी मला अपेक्षा आहे. तुम्हील लहानात-लहान कृतीतून मला सहकार्य कराल तर आपल्या देशाला जगाच्या पटलावर सर्वाच्च स्थानी नेऊन ठेवेन, असं मी वचन देतो. वंदे मातरम्'' विशेष म्हणजे, या पत्रावर पंतप्रधानांचे हस्ताक्षरही दिसतं आहे. पहिल्यांदा पाहिलं तर, हे पत्र खरं असल्याचं सर्वांनाच वाटतं. मात्र, जे दिसतं ते खरं असेलच असं नाही. पंतप्रधानांच्या या पत्रासंदर्भातील सत्यतेची पडताळणी करण्यासाठी एबीपी न्यूज टीमने पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला, त्यावेळी अशा कोणत्याही प्रकारचं पत्र सार्वजनिक करण्यात आलेलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. म्हणजे, पंतप्रधानांनी अशाप्रकारचं कोसलंही आवाहन देशवासियांना केलं नाही. मात्र सोशल मीडियावरुन हे अशा प्रकारचा खोटा मेसेज प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन प्रसारीत होणाऱ्या मेसेजवर कोणीही विश्वास ठेऊ नये असं आवाहन करत आहोत. viral-27-300x240 एबीपी न्यूजच्या पडताळणीत हे व्हायरल होणारे हे पत्र खरं नसल्याचं सिद्ध झालं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran : या युद्धात इराण हरणार नाही, आपण त्यांची साथ द्यायला हवी होती; गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले? 
Iran : या युद्धात इराण हरणार नाही, आपण त्यांची साथ द्यायला हवी होती; गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले? 
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
भारताला मदत करणाऱ्या इराणला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
भारताला मदत करणाऱ्या इराणला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
इराण इस्रायल युद्ध! LPG संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती
इराण इस्रायल युद्ध! LPG संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget