एक्स्प्लोर

2000 च्या नव्या नोटेतील चिपचं व्हायरल सत्य

मुंबई : सोशल मीडियावर 2000 च्या नव्या नोटेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 2000 ची नवी नोट ब्लेडनं कापून त्यातून चिप बाहेर पडत असल्याचं दाखवलं जात आहे. 4 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये चिप असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोबतच ही नोट जमिनीत पुरुन ठेवल्यास ती शोधता येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. 4 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये चिप शोधण्यासाठी कुठे काप द्यायचे ते सांगण्यात आलं आहे. मंगळयानाच्या चित्राजवळ ब्लेडनं कापत नोट पलटून तिकडेही काप देण्यात आले. ब्लेडनं काप दिल्यानंतर बोटानं त्याठिकाणी घासलं जातं, जिथून चिप बाहेर पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा ब्लेडनं काप देत नोटेचा काही भाग वर उचलला जातो. यानंतर नोटेचा वर उचललेला भाग बाजूला काढला जातो. नोटेतील पांढऱ्या रंगाचा चमकणारा भाग कॅमेऱ्याजवळ नेत त्यात काहीतरी असल्याचं भासवलं जातं. तसंच पांढऱ्या भागावर चमकणारी वस्तू हातावर घेत ती चिप असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओनं मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यानंतर एबीपी न्यूजनं या व्हायरल व्हिडीओची सत्यता दाखवली होती. पुन्हा एकदा असाच व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. सोबतच व्हिडीओमध्ये चिप बाहेर काढूनही दाखवली आहे. बीएचयूमध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे प्रमुख सत्यव्रत जीत यांनी चिपबाबत खुलासाही केला आहे. त्यांनी मायक्रो चिप केसाच्या पन्नासाव्या भागासमान असल्याचं सांगितलं. तसंच ते त्यापेक्षाही छोट्या असलेल्या नॅनो चिपवर काम करत असल्याचही स्पष्ट केलं. नॅनोचिप मायक्रो चिपच्या पन्नासाव्या भागाएवढी असते. प्राध्यापक सत्यव्रत जीत यांनी नोटेमध्ये चिप असल्याचा दावा फोल ठरवला आहे. नोटेमध्ये अशी कोणतीही चिप काम करु शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कारण नोटेमध्ये जर चिप लावली तर ती छोटी लावावी लागेल, तीचे सिग्नलही कमी असतील. सोबतच इतक्या साऱ्या नोटांमध्ये चिप लावणं सोपंही नाही. नोटेमध्ये चिप लावल्यास तीला चार्ज करण्यासाठी आणि उपग्रहाशी जोडून ठेवण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही असंही सत्यव्रत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच कोट्यवधी नोटांमध्ये चिप लावून त्यावर नियंत्रण ठेवणंही सोप्पं नसल्याचं त्यांनी सांगितलं. नोटेत चमकणारी वस्तु काय असा प्रश्न शिल्लक राहातोच. पण सत्यव्रत यांनी तो केवळ एक कागदाचा तुकडा असल्यांचं स्पष्ट केलंय. यापूर्वीही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2000 च्या नव्या नोटेत कोणतीही चिप नसल्याचा खुलासा केला होता. 2000 ची एक नोट छापण्यासाठी सरकारला सध्या 3 रुपये 17 पैशांचा खर्च येतो. मात्र नोटेत चिप लावायची झाल्यास हा खर्च 50 रुपयांहून जास्त असेल, जो सरकारला परवडणारा नसेल. नोटेमध्ये चिप लावलेली नसल्याचं समोर आल्यानं एबीपी माझाही तुम्हाला अशा व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत आहे. नोटेत चिप असल्याचा दावा एबीपी न्यूजच्या पडताळणीत व्हायरल असत्य असल्याचं सिद्ध झालं आहे. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Embed widget