Viral News : काही लोकांच्या क्रिएटिव्हीटीचे कौतुक करावे लागेल. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात लोकांच्या क्रिएटिव्हीटीचे उत्तम नमुने पाहायला मिळतात. आता ही लग्नपत्रिकाच घ्या. सध्या एक लग्नपत्रिका इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. या अनोख्या लग्नपत्रिकेची कल्पना रचणाऱ्या व्यक्तीच्या क्रिएटिव्हीटीचे खूप कौतुक केले जात आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक लग्नपत्रिका पाहिल्या असतील, पण अशी लग्नपत्रिका तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल.
एका ट्विटर यूजरने ही अनोखी लग्नपत्रिका पोस्ट केली आहे. या लग्नाचे मेन्यू कार्ड पोस्ट केले आहे. या मेनू कार्डची झलक समोर येताच ती जोरदार व्हायरल झाली आहे. कारण ही लग्नपत्रिका चक्क अडीच इंच रुदींच्या लाकडी पट्टीवर छापण्यात आली आहे. ज्या नीटनेटकेपणाने या दोन इंच रुंद आणि 30 सेमी लांबीच्या लाकडी पट्टीवर लग्नाचे मेन्यू कार्ड छापण्यात आले आहे ते वाखाणण्याजोगे आहे.
मेनू कार्डमध्ये दिली पदार्थांची संपूर्ण यादी
साधारणपणे लग्नाच्या मेन्यूकार्डमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीचं जेवण सुरू होण्याची वेळ सांगितली जाते. मात्र, या लग्नपत्रिकेच्या मेन्यू कार्डची खासियत म्हणजे लग्नात तुम्हाला चाखायला मिळणाऱ्या स्वादिष्ट पदार्थांची संपूर्ण यादी दिली आहे. या यादीमध्ये फिश कालिया, फ्राईड राईस, मटण मसाला आणि आंब्याची चटणी यांचा समावेश आहे.
लग्नानंतरही लग्नपत्रिकेची चर्चा
पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील सुष्मिता आणि अनिमेश यांच्या लग्नाची ही अनोखी लग्नपत्रिका आहे. हे लग्न 2013 मध्ये झाले होते. लग्न सुखाने पार पडले पण लग्नपत्रिका मात्र अद्यापही चर्चेत आहे. नेटकरी या अनोख्या लग्नपत्रिकेचे आणि पत्रिका बनवणाऱ्याचे कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Weather Updates : उत्तर भारतात थंडी कायम, काही ठिकाणी बर्फवृष्टी, 'या' राज्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट
- Omicron : बूस्टर डोसने ओमायक्रॉनविरोधात पूर्ण संरक्षण नाही : WHO चा इशारा, अधिक प्रभावी लस बनवण्याची गरज
- Makar Sankranti 2022 : हिवाळ्यात तीळ खाल्याने 'हा' होईल लाभ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha