Viral News : चप्पल (Slippers) ही प्रत्येकांच्या दैनंदिन जीवनातील वापरली जाणारी वस्तू आहे. अनेक नवनवीन आणि विविध प्रकारचे चप्पल बाजारात उपलब्ध असतात. मात्र, तुम्ही कधी शेणापासून बनवलेली चप्पल (Dung Slippers) कधी पाहिली आहे का? होय, अशी चप्पल रायपूरमध्ये (Raipur) बनवली जाते. ही शेणाची खास चप्पल छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूरमध्ये बनवली जात आहे. रायपूर येथील रितेश अग्रवाल (Ritesh Agrwal) या पशूपालन करणाऱ्या व्यक्तीने प्लॅस्टिकच्या चप्पलऐवजी शेणाचा वापर करून चप्पल बनवली आहे (Viral news dung slippers speciality & price raipur chhattisgarh). या खास चप्पलबद्दल अधिक माहिती जाणून घ्या...
शेणापासून चप्पल बनवणारे पशुपालक रितेश अग्रवाल यांच्या मते, देशात मोठ्या संख्येने गायी प्लास्टिक (Plastic) खाल्यामुळे त्याच्या वाईट परिणामांमुळे (Side Effects of Plastc) आजारी पडतात. अनेक गायींचा (Cow) प्लास्टिकमुळे बळी जातो. अशा परिस्थितीत प्लास्टिकचे उत्पादन (Production) कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. चप्पल बनवण्यासोबतच रितेश यांनी शेणाच्या साहाय्याने चप्पल, दिवे, विटा आणि देवाच्या मूर्ती देखील बनवतात. या व्यवसायामुळे 15 जणांना रोजगारही मिळतो.
शेणाच्या चप्पलची किंमत आणि वैशिष्ट्य
शेणाच्या चप्पलच्या एका जोडीची किंमत (Price) 400 रुपये आहे. या शेणाच्या चप्पलचे वैशिष्ट्य (Speciality) म्हणजे 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतरही चप्पल खराब होत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Tesla is Hiring AI Engineers : टेस्ला एआयमध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवारांना करता येणार अर्ज
लवकरच Nifty 50 आणि बँक निफ्टीत बदल, जाणून घ्या कोणता स्टॉक असेल इन अन् कोणता आऊट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha