नवी दिल्ली : कोरोनाचा (corona)प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशभर कोरोना लसीकरणाच्या ( vaccination)मोहिमेने वेग घेतला आहे. जास्तीत-जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. परंतु, बिहारमध्ये (bihar)लसीकरणात मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथील अरवाल जिल्ह्यामधील करपी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण पोर्टलवर माहिती भरलेल्या लिस्टमधील नावे पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
जिल्ह्यातील करपी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-19 लसीकरण आणि रॅपिड चाचणी करण्यात आलेल्या नावांमध्ये बनावट नावांची नोंद करण्यात आली आहे. या वर्षी 27 ऑक्टोबरमध्ये आरटीपीसीआर आणि लसीकरण केलेल्या नावांमध्ये राजकारणातील काही मोठे लोक आणि फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या नावांची नोंद करण्यात आली आहे.
सरकारी कागदपत्रांतील माहितीच्या आधारे, 27 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी (soniya gandhi), अक्षय कुमार (akshay kumar)आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी एकाच दिवशी, एकाच वेळी कोरोनाची लस घेतली आहे.
जिल्हा दंडाधिकारी जे प्रियदर्शनी यांनी सांगितले की, डेटा फसवणूक कशी आणि कोणाच्या निर्देशानुसार झाली याची चौकशी केली जाईल. "ही एक अतिशय गंभीर बाब आहे. चाचण्या आणि लसीकरण वाढवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतरही अशा घटना घडत आहेत. त्याळे फक्त करपीमध्येच नाही तर आम्ही सर्व आरोग्य केंद्रांवर लक्ष ठेवू. याबात एफआयआर दाखल केला जाईल. दोन कर्मचाऱ्यांना घोटाळ्याबात निलंबित करण्यात आले आहे.
हे प्रकरण पुढे आल्यानंतर बिहाचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सांगितले की, नावे नोंद करत असताना त्यामध्ये चूक झाली आहे. संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई करण्यात आली आहे.
लसीकरण झालेल्या सेलिब्रिटीचे पत्तेही चुकीचे
सरकारी कागदपत्रांच्या आधारे, करपी ब्लॉकच्या पुराण पंचायतीच्या जोन्हा, पुरण आणि डोरा गावात लसीकरण झाल्या सेलिब्रिटींची दाखवण्यात आली आहेत. या पत्त्यांवर तपास केला असता नरेंद्र मोदी किंवा अमित शहा नावाची व्यक्ती सापडली नाही. सोनिया गांधींच्या बनावट निवासस्थानी चौकशी केल्यानंतरही घरात सोनिया नावाचे कोणी नसल्याचे आढळून आले. प्रियांका चोप्राचा पत्ता तपासला असता प्रियांका नावाच्या अनेक मुली आढळल्या मात्र तिच्या नावाला चोप्रा आडनाव नव्हते.
इतर महत्वाच्या बातम्या