Vinesh Phogat Disqualified From Paris Olympic : सुवर्णपदकापासून अवघे एक पाऊल दूर असताना भारताच्या विनेश फोगाटला जास्त वजन भरल्याचं कारण सांगत  अपात्र ठरवण्यात आलं. देशभरातून त्यावर तक्रारीचा सूर निघताना दिसत आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे विनेश फोगाटच्या घरी जाणार आहेत. भगवंत मान हे विनेशच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. 


पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे कुस्तीपटू विनेश फोगटच्या घरी भेट देणार आहेत. हरियाणा आप पक्षाचे उपाध्यक्ष अनुराग धांडा म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह विनेश फोगटचे वडील महाबीर फोगट यांना भेटणार आहोत. या कठीण काळात सर्व देशवासीय देशाच्या मुलीच्या पाठीशी उभे आहेत. 100 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाशी 100 ग्रॅमचे षडयंत्र मान्य नाही असं ते म्हणाले. 


विनेश पॉलिक्लिनिकमध्ये दाखल 


पॅरिस ऑलिम्पिकच्या 12 व्या दिवसाची सुरुवात भारतासाठी दुःखद बातमीने झाली. 50 किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यानंतर विनेश डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध झाली आणि आता तिला खेल गावच्या पॉलिक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे.


विनेश फोगाटला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नव्हे तर डिहायड्रेशनमुळे स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलिक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने बुधवारी एक निवेदन जारी करून विनेशला जास्त वजनामुळे खेळातून वगळल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि कुस्तीपटूच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले.


क्युबाच्या युस्नेलिस गुझमनला आस्मान दाखवलं


स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर विनेश स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहील. मंगळवारी रात्री उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करून ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती.


मोदींनी IOA प्रमुख पीटी उषा यांच्याशी चर्चा केली


सेमीफायनलमध्ये विजय मिळविल्यानंतर विनेशने जॉगिंग, स्किपिंग आणि सायकलिंग करून वजन कमी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.  आता विनेशला अपात्र ठरवल्यानंतर भारतासमोर कोणते पर्याय आहेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IOA प्रमुख पीटी उषा यांच्याशी चर्चा केली.


ही बातमी वाचा: