नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात भाज्यांचे दर हे बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत असंच म्हणावं लागेल. याचा फटका शेतकरी, ग्राहक, भाजी विक्रेते, वाहतूकदार अशा सगळ्या घटकांवर होतो आहे. कारण भाजी महाग झाल्याने लोक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे. परिणामी मागणी, पुरवठा या सगळ्यावर परिणाम जाणवतो आहे.
जर आपल्या खिसा आणि खर्च, याला जोडून जर सरकारी आकडेवारीवर नजर टाकली तर बहुतांश भाज्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. फक्त टोमॅटोबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दिल्लीत 39 रुपये किलोने विकले जातो आहे, तर एक वर्षापूर्वी त्याची किंमत 15 रुपये होती.
राजधानी वगळता इतर शहरांमध्ये टोमॅटो अनेक पटींनी महाग झाला आहे. मुंबईत टोमॅटोची किंमत 77 रुपये प्रति किलो आहे, जी गेल्या वर्षी 28 रुपये होती. कोलकात्यातही गेल्या वर्षी 38 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता ७७ रुपयांवर पोहोचला आहे. रांचीमध्येही त्याची किंमत ५० रुपये किलो आहे, जी गेल्या वर्षी 20 रुपयांना विकला जात होता.
उत्पादन राज्यांकडून पुरवठ्यावर परिणाम
टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे त्याचा पुरवठा करणाऱ्या राज्यातून इतर ठिकाणी पुरवठा होतो आहे असं मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही टोमॅटो उत्पादनाची प्रमुख राज्ये आहेत. जिथून त्याच्या पुरवठ्यात अडथळे येतात. केवळ टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे दरही प्रचंड वाढले आहेत.
गेल्या वर्षी दिल्लीत बटाट्याचा भाव 20 रुपये किलो होता, तो आता 22 रुपयांनी विकला जातो आहे. मुंबईत गतवर्षी 21 रुपये किलोने विकले जाणारे बटाटे आता 27 रुपयांनी विकले जात आहेत. कोलकात्यातही बटाटे गेल्या वर्षी 16 रुपयांवरून 27 रुपये किलो झाले आहेत. रांचीमध्येही त्याची किंमत एका वर्षात 17 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.
कांद्याच्या किंमतीतही घट
अनेकदा ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या रडवलं आहे. दिल्लीत कांद्याचा भाव गेल्या वर्षी 28 रुपयांवरून 24 रुपयांवर आला आहे. मुंबईतही 25 रुपयांवरून 18 रुपयांवर, कोलकात्यात 27 रुपयांवरून 23 रुपयांवर आणि रांचीमध्ये 25 रुपयांवरून 18 रुपयांवर प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. ही आकडेवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली आहे.
सर्वात मोठे कारण- महाग तेल
भाज्यांच्या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे महागडे इंधन आहे असं एमके ग्लोबल फायनान्स सर्व्हिसेसच्या चीफ इकॉनॉमिस्ट माधवी याचं म्हणणं आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे भाजीपाल्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून, त्यामुळे किरकोळ विक्रीच्या दरात वाढ झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये 10.80 टक्क्यांवर पोहोचली आहे, जी महिन्यापूर्वी 3.5 टक्क्यांवर होती. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही 1.6 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.