VVIPs Security To Restore: पंजाबी (Punjab) गायक सिद्ध मुसेवालाच्या हत्येच्या पाच दिवसानंतर पंजाब सरकारने 7 जूनपासून सर्व VVIP ची सुरक्षा पुर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती हायकोर्टात दिली. माजी मंत्री ओपी सोनी यांनी सरकारच्या सुरक्षा कमी करण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. मान सरकारने राज्यातील 424 VVIPची सुरक्षा कमी केली होती. त्यामुळे आता या सर्वांना पूर्वीप्रमाणेच सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.
पंजाबी गायक व कॉंग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांच्या हत्येनंतर आप सरकार विरोधकांच्या रडावर आली आहे. तसेच सुरक्षा कमी केल्याच्या मुद्द्यावर प्रत्येक नेता आप या पक्षाला सिद्धूच्या मृत्यूसाठी जबाबदार धरत होता. मात्र यावर सरकारने कोर्टात ऑपरेशन ब्लूस्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त सुरक्षा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले.
सरकारचा 'यु-टर्न'- भाजप नेता
राज्य सरकारच्या कोर्टातील या भूमिकेमुळे भाजप नेत्यांनी सरकारला टोला लागावला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून राज्यातील VVIP संस्कृती संपविण्याबाबत जाहीरात करण्यात येते आणि नंतर पुन्हा निर्णय फिरवते. सरकारच्या या स्टंटमुळे पंजाबच्या एका रत्नाला आपले प्राण गमवावे लागणार असल्याचे भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले.
अकाली नेते विक्कूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
अकाली नेते विक्कू मिद्दूखेडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर होता. गेल्यावर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी डॉ. विजय सिंघला यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अलिकडेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंघला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.
'लिस्ट' व्हायरल केल्याचा आरोप
पंजाबमधील आप सरकारने 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. आप सरकारने ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. सरकारने सुरक्षा कमी केल्यानंतर त्याची यादी व्हायरल केल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.