फारुखाबाद : उत्तरप्रदेशच्या फारुखाबाद जिल्ह्यातील कठरिया गावात लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी ठार केलं आहे. या माथेफिरुनं या मुलांना एका घरात ठेवलं. घरातून त्याने पोलिसांवर गोळीबार आणि हॅन्ड ग्रेनेडचा मारा केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत माथेफिरुसह त्याची पत्नीही ठार झाली असून मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या वृत्ताला उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी दुजोरा दिला आहे. तर, दुसरीकडे, गावातील लोकांनी मारहाण केल्यामुळे आरोपीच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी एका व्यक्तीने वाढदिवस साजरा करण्यासाठी 23 मुलांना आपल्या घरी बोलावून ओलिस ठेवलं होतं.


ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी जे ऑपरेशन केलं त्याला 'ऑपरेशन मासूम' हे नाव देण्यात आलं होतं. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर डीजीपी ओ. पी. सिंह यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की, सुभाष नाथम नावाच्या आरोपीला पोलिसांनी ठार केलं आहे. या आरोपीने मुलांना ओलिस ठेवलं होतं. त्यावेळी आरोपीच्या बाजून फायरिंग करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीही फायरिंग केली. यावेळी आरोपी ठार झाला आणि 23 मुलांना सुखरूप सोडवण्यात आलं.


पाहा व्हिडीओ :  उत्तरप्रदेशच्या फारुखाबादमध्ये माथेफिरुनं 23 मुलांना ओलीस ठेवलं 



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपीच्या तावडीतून 23 मुलांची सुखरूप सुटका करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीमला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली आहे. खात्मा करण्यात आलेल्या आरोपीवर 2001 मध्ये गावातील एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. या हत्येच्या प्रकरणात सध्या त्याची जमीनावर सुटका झाली होती, असे ओ. पी. सिंह यांनी सांगितले. याप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री स्वतः माहिती घेत होते. तसेच वरिष्ट अधिकाऱ्यांना घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.


दरम्यान, ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या घराभोवती वेढा दिला होता. परंतु, संध्याकाळपर्यंत मुलांची सुटका करण्यात यश आलं नाही. त्यानंतर मुलांच्या सुटकेसाठी दहशतवाद विरोधी पथकाला पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली होती. तरिही आरोपीला पकडण्यात यश आलं नव्हतं. त्यामुळे राज्य सरकारकडून एनएसजी कमांडोची मागणी करण्यात आली. त्यानंतर तब्बल 11 तासांच्या थरारानंतर आरोपीचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं.


संबंधित बातम्या : 


Jamia Firing । गोळीबार करण्याआधी आरोपीनं केलं फेसबुक लाईव्ह, म्हणाला- 'शाहीन बाग, खेल खत्म' 


गोमंतकीयांना 1 फेब्रुवारीपासून कॅसिनोवर नो एन्ट्री