Uttarakhand Kedarnath Helicopter Crash : उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा प्रवासी होते. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.  


उत्तराखंडमधील (Uttarakhand) केदारनाथपासून (Kedarnath) 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 जण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. 






मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर केदारनाथहून परतत होतं. त्याचवेळी हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो केदारनाथ धामचा जुना मार्ग होता. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. त्यापैकी या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.






केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. गौरीकुंडजवळ हा अपघात झाा. हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचं असल्याचं समजतं. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथक बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत. 


दाट धुक्यामुळे अपघात?


मदत आणि बचावकार्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे.अपघाताचा बळी ठरु शकतो.


2019 मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात


2019 मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होतं. प्रवाशांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग जमिनीवर आदळल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह सहा प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती.


2013 मध्ये बचाव कार्यादरम्यान तीन हेलिकॉप्टर कोसळले


केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी 2013 च्या केदारनाथ दुर्घटनेत बचावकार्य करताना हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरसह तीन हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातांमध्ये 23 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.