Petrol Diesel Price in 18 October 2022 : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. आज सकाळी जाहीर झालेल्या नव्या दरांमध्ये, कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. सरकारी तेल विपणन कंपन्या इंडियन ऑईल (IOC), BPCL आणि HPCL यांनी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत आणि त्यात कोणतीही कपात केलेली नाही. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरांत (Diesel) कोणताही बदल झालेला नाही. 

कच्च्या तेलाचे दर काय? 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज घटल्या आहेत. ब्रेंट क्रूड 92 डॉलर्सच्या खाली गेले आहे आणि आज प्रति बॅरल 91.69 डॉलरवर आहे. याशिवाय, WTI क्रूड प्रति बॅरल 85.49 डॉलर्सच्या दरावर स्थिर आहे.   

राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

देशातील महानगरांतील किमती काय? 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये

92.76 रुपये

तुमच्या शहरांतील दर कसे तपासाल? 

तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.