चमोली: उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात एक भलामोठा हिमकडा कोसळल्याने मोठं नुकसान झालं होतं. या आपत्तीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत 56 लोकांचे प्रेत हाती लागले असून बचावकार्य सुरु आहे. अद्याप 149 लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय.


विशेषतज्ञ आणि डिएनए एक्सपर्ट यांच्या मदतीने या सर्व 56 मृतांचे डीएनए सॅम्पल जमा करण्यात आले आहेत. यापैकी 30 जणांची ओळख पटली असून त्या मृतांचे पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यात येत आहे.


उत्तराखंड आपत्तीला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. आयटीबीपी आणि लष्कराच्या मदतीने अद्यापही बचावकार्य सुरु आहे. राज्य सरकारच्या वतीने सोमवारपर्यंत 1295 लोकांची आरोग्य चाचणी करण्यात आली असून इतरही लोकांची आरोग्य चाचणी करण्यात येत आहे. या परिसरात अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे.


Uttarakhand Glacier Burst: तपोवनातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सैन्याच्या बचावकार्यात बदल


उत्तराखंडच्या या आपत्तीत सर्वात जास्त नुकसान हे एनटीपीसीच्या पॉवर प्रोजेक्टचे झाले आहे. जवळपास 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या पॉवर प्रोजक्टमुळे या ठिकाणी टनेलचे काम जोरात सुरु होतं. हिमकडा कोसळल्यानंतर 350 किमी प्रति तास या वेगाने पाणी या ठिकाणी पोहचले. त्यामुळे पाण्यासोबत वाहून आलेल्या चिखलाने हा बोगदा बंद झाला आहे.


या प्रोजेक्टवर काम करणारे कर्मचारी या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर आणि एसडीआरएफ ने एक संयुक्त मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम रात्रभर सुरु आहे.


Uttarakhand | कोई है... ? अहोरात्र मेहनत घेत तपोवन बोगद्यात ITBPच्या 'हिमवीरां'कडून शोधमोहिम