Uttarakhand: चमोली जिल्ह्यात एक भलामोठा हिमकडा कोसळ्यामुळं मोठं नुकसान झालं आहे.. नद्यांवर सुरु असणाऱ्या प्रकल्पांनाही याचा फटका बसला असून संपूर्ण प्रकल्पच नव्हे तर त्यावर काम करणारे मजूरही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. तपोवन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आयटीबीपी आणि इतर यंत्रणांनी कंबर कसली असून बचावकार्यात बदल केला आहे.


उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर टनेलमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सैन्यानं बचावकार्यात बदल केला आहे. टनेलमध्ये 72 मीटरवर सैन्यानं खोदकाम सुरु केलंय. टनेलमध्ये 16 मीटर खाली खोदकाम करून अडकलेल्या कामगार आणि प्रोजेक्ट मॅनेजरला वाचवण्याचा सैन्याचा प्रयत्न आहे. रात्री 3 वाजता हे नवं बचावकार्य सुरु करण्यात आलंय. ड्रिलिंग पूर्ण झाल्यानंतर त्यातून कॅमेरा दुसऱ्या बोगद्यात पाठवला जाणार आहे. कॅमेरा आत गेल्यानंतर बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित आहेत की नाही याबाबत माहिती मिळू शकेल.


आतापर्यंत 34 लोकांचे शव हाती लागले असून अजून 170 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. उत्तराखंडच्या या आपत्तीत सर्वात जास्त नुकसान हे एनटीपीसीच्या पॉवर प्रोजेक्टचे झाले आहे. जवळपास 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या पॉवर प्रोजक्टमुळे या ठिकाणी टनेलचे काम जोरात सुरु होतं. हिमकडा कोसळल्यानंतर 350 किमी प्रति तास या वेगाने पाणी या ठिकाणी पोहचले. त्यामुळे पाण्यासोबत वाहून आलेल्या चिखलाने हा बोगदा बंद झाला आहे.


संबंधित बातम्या :



Uttarakhand | कोई है... ? अहोरात्र मेहनत घेत तपोवन बोगद्यात ITBPच्या 'हिमवीरां'कडून शोधमोहिम


Uttarakhand Glacier Collapse: तपोवनातील बोगद्यात 35 जण अडकल्याची भीती, बचावासाठी ऑपरेशन सुरु


Uttarakhand Glacier Collapse | महाप्रलयातील 30 सेकंदाचा थरार... काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ