Uttarakhand Accident : उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ओझरी ते सायना चाटी दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बोलेरो वाहनाचा अपघात झाला. यामध्ये चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.


मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश


मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. इतर दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट आणि नौगाव येथे दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


बारकोटला निघाले होते वाहन


महाराष्ट्रातील 12 प्रवाशांना घेऊन बोलेरो वाहन गुरुवारी सायंकाळी उशिरा जानकीछत्ती येथून बरकोटकडे रवाना झाले. रात्री उशिरा हे वाहन यमुनोत्री धामपासून 28 किमी अंतरावर असलेल्या ओझरीजवळ पोहोचले. बसला साईड देताना हा अपघात झाला. येथे चालकाने बसला साईड देण्यासाठी बोलेरो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो थेट खोल दरीत कोसळली.


10 जखमींना दरीत बाहेर काढण्यात यश
पोलीस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने शोध आणि बचावकार्य राबवत चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना खोल दरीतून बाहेर काढलं. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्ता अरुंद होता आणि सुरक्षाव्यवस्था नव्हती.


जखमींची प्रकृती धोक्याबाहेर
उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी माहिती दिली की, यमुनोत्री येथे झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.


मृतांची नावे



  • पूरण नाथ (वय 40) राहणार शिव दर्शन सीएचसी लि. पीएमजीपी कॉलनी महाकाली केव्स रोड, अंधेरी, (पूर्व) मुंबई.

  • जयश्री अनिल कोसरे (वय 26) राहणार तुमसर, भंडारा, महाराष्ट्र.

  • अशोक महादेवराव शांडे (वय 40) राहणार नागपूर, महाराष्ट्र.


जखमींची नावे (सर्व महाराष्ट्रातील रहिवासी)



  • प्रेरणा (वय 08) 

  • अंजू अशोक (वय 04) 

  • बोदी (वय 10) 

  • प्रमोद तुलसी राम (वय 52) 

  • बाळकृष्ण जितू (वय 41) 

  • लक्ष्मी बाळकृष्ण कोसरे (वय 46).

  • दिनेश (वय 35) 

  • मोनिक (वय 24) 

  • क्रिशिता (वय 15) 

  • रचना (वय 38) 


महत्त्वाच्या इतर बातम्या