एक्स्प्लोर

'गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातलेल्या महिला काय संस्कार देणार?' उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.  

देहरादून : उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेली जीन्स पाहून मनात प्रश्न येतो की यामुळं समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतात, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असं तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे. देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.  

तीरथ सिंह रावत म्हणाले की, ''मी जयपूरला एका कार्यक्रमासाठी जात होतो. जहाजातून प्रवास करत असताना तिथे एक महिला आपल्या 2 मुलांसोबत होती आणि तिने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातली होती. मी जेव्हा तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. मी एक स्वयंसेवी संस्था चालवते, असं तीनं मला सांगितलं, असं तीरथ सिंह रावत म्हणाले.  रावत म्हणाले की, तेव्हा मी विचार केला की, जर स्वयंसेवी संस्थाचालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल? आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं कधीच नसायचं, असंही तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे. 

Uttarakhand | उत्तराखंडची कमान आता तिरथ सिंह यांच्यावर; कोण आहेत तिरथ सिंह? 

तीरथ सिंह म्हणाले की, आजकाल फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते, असं ते म्हणाले. ते म्हणाले की,  आपण जसं वागतो, त्याचंच लहान मुलं अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. आपण कितीही पुढारलेलो असलो तरी चांगले संस्कार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही, असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले.

तीरथ सिंह रावत यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागावी -  प्रियांका चतुर्वेदी 
दरम्यान तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.  संस्काराच्या गोष्टी करणाऱ्या या लोकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत कधी बोलणार असा सवाल देखील चतुर्वेदी यांनी केला आहे. आज महिलांना सुरक्षा हे लोक देऊ शकत नाहीत, त्यांनी आधी देशातील महिलांना सुरक्षा देण्याचं पाहावं, असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget