देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
One Nation, One Election: 'एक देश, एक निवडणूक' संदर्भात समितीची आज पहिली बैठक , कामाचा आराखडा बैठकीमध्ये तयार होणार?
नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूकी'साठी (One Nation One Election) स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक शनिवारी (23 सप्टेंबर) रोजी पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या समितीचं अध्यक्षपद माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याकडे सोपवण्यात आलं. दरम्यान या बैठकीमध्ये कामाचा आरखडा कसा तयार करायचा यासंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर
Amit Shah to Visit Lalbaugcha Raja : अमित शाह आज लालबागमध्ये, लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार, नंतर शिंदे, फडणवीसांच्या बाप्पांचं दर्शन घेणार
Amit Shah to Visit Lalbaugcha Raja : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आज मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर अमित शाह सर्वात आधी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) उपमुख्यंत्र्यांसह काही भाजप नेत्यांच्या बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. तर, मुंबई विद्यापीठीत (Mumbai Vidyapeeth) एका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता शाह दिल्लीला रवाना होणार आहेत. वाचा सविस्तर
अलोट गर्दी , प्रचंड धक्काबुक्की, VVIP साठी विशेष व्यवस्था, वृद्ध, लहानग्यांसाठी काहीच नाही; लालबाग राजाच्या मंडळाविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Complaint Against Lalbaugcha Raja Mandal: मुंबईतील (Mumbai News) लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडपात मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप होत आहे. खरंतर, लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja 2023) मंडळात भाविकांची रांग प्रचंड मोठी असते. कित्येक तास या रांगेत उभं राहावं लागतं. अशातच काही वेळा गाभाऱ्यात प्रवेश करताना धक्काबुक्की होते. वाचा सविस्तर
"कॅनडामध्ये निज्जरची हत्या हिंदुत्वाचा..."; कॅनडा-भारत तणावादरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया, हिंदुत्त्वाची इसिसशी तुलना
Canada India Tensions: आता कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्या प्रकरणावरुन भारत (India) आणि कॅनडामधील (Canada) तणाव वाढला आहे. यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली असून आता याप्रकरणी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडानं उपस्थित केलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलत पाकिस्तानच्या पंतप्रधानानंनी थेट हिंदुत्वावर निशाणा साधला आहे. तसेच, त्यांनी हिंदुत्वाची तुलना इसिसशी केली आहे. वाचा सविस्तर
Millionaires Left India: यावर्षी 6500 श्रीमंत भारतीय सोडणार देश, चीनची अवस्था आणखीनच बिकट... 'या' देशाला सर्वाधिक पसंती
Millionaires Left India: दरवर्षी लाखो लोक चांगल्या रोजगारासाठी परदेशात जातात. पण या सगळ्यातही असे शेकडो श्रीमंत लोक आहेत, जे दरवर्षी देश सोडून परदेशात स्थायिक होतात. बरं, श्रीमंत लोकांसाठी परदेशात जाऊन स्थायिक होणं ही काही नवीन गोष्ट नाही. या वर्षीही मोठ्या संख्येनं श्रीमंत भारतीय देश सोडून जाण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, यावर्षी चीनमधील (China) बहुतांश कोट्याधीश इतर देशांमध्ये जाऊन स्थायिक होणार आहेत. या यादीत भारत (India) दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत देशातील श्रीमंत देश का सोडत आहेत? हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. वाचा सविस्तर
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : पंचतारांकित हॉटेल, वेडिंग मेन्यू ते नो फोन पॉलिसी; परिणीती-राघव यांच्या शाही विवाहसोहळ्याबद्दल एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही...
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय आहे. शाही विवाहासाठी दोघेही उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. पंजाबी आणि राजस्थानी परंपरेनुसार दोघांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. वाचा सविस्तर
23 September In History : भारतात बालविवाहाला बंदी, भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन, भारत-पाकिस्तान युद्ध विराम; आज इतिहासात...
23 September In History : प्रत्येक दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गाजलेली 'चले जाव' या घोषणेचे जनक, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते युसूफ मेहरअली यांचा आज जन्मदिन आहे. भारतात पहिल्यांदाच कायद्याद्वारे बालविवाहाला बंदी घालण्यात आली. त्याशिवाय, 1965 भारत-पाकिस्तान युद्ध विराम जाहीर करण्यात आला. वाचा सविस्तर