नांदेड: मागील काही दिवसांपासून कॅनडा आणि भारतातील (India vs Canada) संबंध बिघडले असून, भारतावर बेछुट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारत सरकारने तगडा झटका देत व्हिसा सेवा बंद केली आहे. कॅनडामधील (Canada) भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाईटवर या बाबत घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या 'व्हिसा'बंदीच्या निर्णयाने कॅनडात असलेले शेकडो नांदेडकर (Nanded) अडकले असून, कॅनडामधून सचखंड येथे दर्शनासाठी आलेले भाविकांचीही मोठी अडचण झाली आहे. 


नांदेडमधील शेकडो नागरिक आजघडीला व्यवसाय आणि नोकरीनिमित्त कॅनडात गेले आहेत. परंतु, नांदेडातून इमिग्रेशनची सेवा नसल्यामुळे त्याची नेमकी नोंद नाही. तर, दुसरीकडे नांदेडात वर्षभर कॅनडात स्थायिक झालेले भाविक दर्शनासाठी येतात. हे नागरिक विशेष करून पंजाब येथून कॅनडात जातात. तर, काही नागरिक हे औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि मुंबई या इमिग्रेशनची व्यवस्था असलेल्या ठिकाणाहून कॅनडाचा प्रवास करतात. त्यामुळे नांदेडातून कामानिमित्त कॅनडात जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, 'व्हिसा'बंदीमुळे शेकडो नागरिक कॅनडात अडकले आहेत. त्यामुळे आता याबाबत प्रशासनाकडून काही हालचाली केल्या जातात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


नांदेडच्या बहुतांश नागरिकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तर, काहीजण चालक म्हणूनही नोकरीवर आहेत. त्यामुळे मागील काही वर्षात शेकडो नांदेडकर नोकरीच्या निमित्ताने कॅनडामध्ये गेले आहेत. मात्र, असे असतांना मागील काही दिवसांत भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे आता हा वाद एवढ्या विकोपाला गेला आहे की, भारताने थेट कॅनडाचा 'व्हिसा'बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हिसा सेवा बंद केल्यामुळे या नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.


काय आहे नेमका वाद?  


मागील काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु असलेला वाद गंभीर बनला आहे. त्यामुळे आता याचे पडसाद दोन्ही देशांमध्ये उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या वादाचे मुख्य कारण कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या संसदेमध्ये केलेलं एक विधान ठरलं आहे. "खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाला भरताने आपल्या भाषेत उत्तर दिले. पुढे दोन्ही राष्ट्रांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. तर वाद एवढ्या पुढे गेला आहे की, आता भारताने कॅनडाचं व्हिसा सेवा बंद केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


India-Canada Tension : कॅनडाला भारत सरकारचा तगडा झटका; भारताकडून व्हिसा बंदी, दोन्ही देशात तणाव वाढला