Major Dhyan Chand Sports University: क्रीडा शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरठसाठी (Meerut) आजचा दिवस खास ठरलाय. मेरठमध्ये आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची (Major Dhyan Chand Sports University) पायाभरणी करण्यात आलीय. सध्या मोदींनी  उत्तर प्रदेशमध्ये विकास कामांचा धडाका सुरू केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेरठमधील सरधना येथे क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून या क्रीडा विद्यापीठाला नाव देण्यात आलंय. सुमारे 92 एकर जागेवर हे विद्यापीठ सुमारे 700 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे.  क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणीपूर्वी पंतप्रधानांनी राज्यभरातील खेळाडूंशी संवाद साधला. पंतप्रधानांची भेट घेणाऱ्यांमध्ये ऑलिंपियन आणि पॅरा ऑलिम्पियन खेळाडूंचा समावेश होता. तसेच नोएडा जिल्हा दंडाधिकारी आणि पॅरा ऑलिम्पियन सुहास एलवाय हे देखील उपस्थित आहे. 


मोदी काय म्हणाले?
"राज्यात तत्कालीन सरकारच्या काळात गुन्हेगार आणि माफियाचा आपपले खेळ खेळायचे. त्यावेळी राज्यात अवैध धंद्याच्या स्पर्धा होत असतं. मुलींवर टीका करणारे मुक्तपणे फिरत होते. या सर्व गोष्टी मेरठच्या आसपासचे लोक कधीच विसरू शकत नाहीत. आता योगी आदित्यनाथ यांचं सरकार त्यांच्यासोबत जेल-जेल खेळत आहे. पाच वर्षांपूर्वी मेरठच्या मुली संध्याकाळनंतर घराबाहेर पडायला घाबरत होत्या. आज मेरठच्या मुली संपूर्ण देशाचा नाव उज्जल करीत आहेत. यूपीमध्ये आता खऱ्या खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे, आता यूपीच्या तरुणांना क्रीडाविश्वात रमण्याची संधी मिळत आहे", असं मोदींनी म्हटलंय. 


नरेंद्र मोदींचं ट्वीट-



मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची खासियत काय असेल?
1) तब्बल 700 कोटी रुपयांचा खर्च करुन मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ बांधले जाणार आहे. 
2) हे नवीन विद्यापीठ आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
3) एकाच वेळी 1 हजार 80 खेळाडूंना प्रशिक्षण देता येईल.
4) अॅथलेटिक्ससारख्या मैदानी खेळांसाठी 25 ते 30 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था असेल.
5) कुस्ती, खो-खो, कबड्डी या खेळांसाठी 5 हजार क्षमतेचा हॉल बांधण्यात येणार आहे.
6) विद्यापीठात सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान असणार आहे.
7) बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, लॉन टेनिस कोर्ट देखील असेल.
8) नेमबाजी आणि तिरंदाजीसाठी शूटिंग रेंजही असेल.
9) सिंथेटिक रनिंग स्टेडियम, स्विमिंग पूल अशा सुविधाही या विद्यापीठात असतील.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha