लखनऊ : उत्तर प्रदेशात हजारो मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्याची घटना उघडकीस आली आहे. एटीएसकडून या घटनेचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. धर्मांतरासाठी आयएसआयकडून आणि परदेशातील संस्थांकडून मदत मिळत होती असा संशय एटीएसला होता. 


जवळपास एक हजाराहून जास्त लोकांचं धर्मांतर करण्यात आलं असून उत्तर प्रदेशमधील या धर्मांतरामध्ये मूकबधीर मुलं, महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, शारीरिक विकलांग आहेत त्यांना पैशाचं आणि नोकरीचं आमिष दाखवण्यात येत होतं. या प्रकरणी दोन व्यक्तींना एटीएसने अटक केली असून ते दोघेही मौलवी आहेत. विशेष म्हणजे ते दोघेही पिता-पुत्र असून दिल्लीत राहतात. 


उत्तर प्रदेशातील धर्मांतरामागे परदेशी कनेक्शन असल्याने याचा तपास गांभिर्यांने केला जात आहे.


उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी तसेच लव्ह-जिहाद प्रकरणांच्या विरोधात पावलं उचलण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं कायदे करण्यात येत आहेत. मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घातले असून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात कायदे करुन त्यांनी कडक शिक्षा करणार असल्याचं सांगितलं होतं. 


उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा पारित
उत्तर प्रदेश सरकारने कॅबिनेटमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा पारित करण्यात आला आहे. तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या कायद्यानुसार, फसवणूक, लोभ, जबरदस्ती किंवा इतर फसवणुकीने लग्न करणे म्हणजे दुसर्‍या धर्मात बदल करणे हा गुन्हा असेल. तसेच लग्नानंतर सक्तीने धर्मांतर केल्यास शिक्षा देण्यात येणार आहे. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे धर्मांतर केल्यावर दंडाची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे. 


सामूहिक धर्मांतर झाल्यास सामाजिक संस्थांची नोंदणी रद्द केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाणार असं उत्तर प्रदेशच्या या कायद्यात सांगितलं आहे.  या प्रकरणी दोषीला 1 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद तसेच 15,000 दंड ठोठावण्यात येणार आहे. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या प्रकरणात 3 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा तसेच 25000 दंड आकारला जाईल. धर्म परिवर्तन करण्यासाठी दोन महिने आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल. याचं उल्लंघन केल्याबद्दल 6 महिने ते 3 वर्षे शिक्षा तसेच 10000 दंड होईल अशीही तरतूद या कायद्यात आहे.   


महत्वाच्या बातम्या :