Corona Update India : देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. देशात 91 दिवसांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,640 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1167 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 22 मार्च रोजी 40,715 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात 81,839 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 99 लाख 77 हजार 861
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 89 लाख 26 हजार 38
एकूण सक्रिय रूग्ण : 6 लाख 62 हजार 521
एकूण मृत्यू : 3 लाख 89 हजार 302


देशात सलग 40व्या दिवशी कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 21 जूनपर्यंत देशभरात 28 कोटी 87 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 86 लाख 16 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 39 कोटी 40 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 16 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन 3 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या यादीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतप सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख , मृत्यूचं प्रमाणही घटलं


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. काल 6,270 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 13,758 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,33,215 इतकी झालीय. काल 94 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.89 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 94 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,79, 051 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,71,685 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.