14 Years of ABP Majha : एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. 


एक दोन नव्हे तर 14 वर्षे.... होय... महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल ही ओळख एबीपी माझानं 14 वर्षे कायम ठेवली आहे. अचूक आणि जलद बातमी... प्रेक्षकांची विश्वासर्हता या त्रिसुत्रीची कास एबीपी माझानं कधी सोडली नाही आणि सोडणारही नाही. एबीपी माझावर आज दिवसभर वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. दरम्यान एबीपी माझाच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना बोलतं केलंय संजय राऊत यांनी. 10 वाजता हा कट्टा पाहायला विसरु नका आणि माझा कट्ट्यानंतर महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी आम्ही दिवसभर मंथन करणार आहोत, माझा संवाद या विशेष मालिकेत.


'एबीपी माझा'च्या 14 वर्षांच्या प्रवासात आणखी एक आनंदाचा क्षण जोडला गेला आहे. 'एबीपी माझा'च्यावर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वात मोठा माझा इम्पॅक्ट दिसून आला आहे. एबीपी माझाच्या बातमीने 30 वर्ष अंधारात खितपत पडलेल्या बरडवस्ती प्रकाशमान झाली. आतापर्यंत अंधारात असलेलं औरंगाबादमधील बरड गाव 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर प्रकाशमान झालं. आहे. तब्बल 30 वर्ष हे गाव अंधारत होतं. गावात वीजच नव्हती. एबीपी माझाने गावच्या आधारलेल्या व्यथा मांडल्या आणि अवघ्या 10 दिवसांत गाव प्रकाशमान झालं. गावकऱ्यांच्या आनंदला पारावार उरला नाही. गावकऱ्यांनी आज आनंदाने गुढ्या उभ्या केल्या आहेत. 


एबीपी माझामध्ये नवे बदल, काय आहेत हे बदल, का गरजेचा आहे बदल?, 'माझा'ची भूमिका