सर्कल ऑफिसर श्रेष्ठा ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या कार्यकर्त्यांची मुजोरी सहन न करता चोख उत्तर दिलं. भाजप नेते प्रमोद लोधी यांच्याकडे गाडीची कागदपत्रं नसल्यामुळे त्यांचं चलान म्हणजेच दंड आकारण्यात आला. याविरोधात भाजप समर्थकांनी गुंडगिरी करत श्रेष्ठा ठाकूर यांना जाब विचारला.
'तुम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जा आणि पोलिसांना वाहनं तपासण्याचा कोणताही अधिकार नाही, हे लेखी आणा' असं उत्तर ठाकूर यांनी लोधी यांना दिलं. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचं नाव बदनाम होतं, अशा शब्दात श्रेष्ठा यांनी खडे बोल सुनावले.
'आम्ही पोलिस कर्तव्य बजावण्यासाठी तासन् तास उभे राहतो, हौस म्हणून नाही.' असं म्हणत उपस्थितांची बोलती बंद केली.
पाहा व्हिडिओ :