एक्स्प्लोर
यूपीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू
उत्तरप्रदेशात खासगी बसच्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. यूपीच्या मैनपूर जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे.

लखनौ : उत्तरप्रदेशात खासगी बसच्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. यूपीच्या मैनपूर जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झालेली खासगी बस मुजफ्फरपूरहून दिल्लीला जात होती. भरधाव वेगातील बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि ती डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यानंतर ही बस पलटली आणि यातच 16 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात 15 हून अधिकजण जखमी झाले असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच जखमींवर योग्य उपचारांसाठीही रुग्णालयांना निर्देश दिले आहेत.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















