Uttar pradesh Barabanki Accident : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये मोठा अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसला वेगाने आलेल्या ट्रकनं धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात बसमधील आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या 19 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. दरम्यान मृतांची संख्या वाढू शकते अशी देखील माहिती आहे.
माहितीनुसार या अपघातातील मृत आणि जखमी झालेले लोक हे मजूर होते. ते पंजाबहून बिहारला चालले होते. बस खराब झाल्यानं रस्त्याच्या कडेला उभी केली होती. यामुळं काही प्रवाशी खाली उतरुन बस सुरु होण्याची वाट पाहात होते तर काही जण बसमध्येच होते. अचानक वेगाने येत असलेल्या ट्रक बसला धडक दिली.