मुंबई : एटीएममधून पैसे काढताना त्यासाठी किती शुल्क आकारलं जातं हे अनेकांना माहितही नसेल. त्यात आता एटीएममधून पैसे काढणे 1 ऑगस्टपासून महागणार आहे. 1 ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्जॅक्शनवरील शुल्क वाढवले आहे. आरबीआयने आर्थिक व्यवहारासाठी इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपयांवर आणली आहे. नॉन फायनान्शियल ट्रान्जॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले आहे.


एटीएम ट्रान्जॅक्शनसंबंधीचे हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होतील. रिझर्व्ह बँकेच्या मते, इंटरचेंज फी बँकाद्वारे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे देताना व्यापाऱ्यांना दिले जाते. हे शुल्क बँक आणि एटीएम कंपन्यांमध्ये नेहमीच वादाचा विषय राहिला आहे.


1 ऑगस्टपासून दर लागू होणार


आरबीआयने एटीएम व्यवहारासाठी इंटरचेंज फी प्र्त्येक फायनान्शियल ट्रान्जॅक्शनवर 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत वाढवले आहे. नॉन फायनान्शियल ट्रान्जॅक्शनसाठी शु्ल्कात 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. 1 ऑगस्टपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होईल.


एटीएममधून पैसा काढण्याच्या नियमात बदल


ग्राहकांना बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत ट्रान्जॅक्शन मिळतात. यात फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ट्रान्जॅक्शनचा समावेश आहे. यानंतर एटीएममधून प्रत्येक ट्रान्जॅक्शनसाठी 20 रुपये द्यावे लागतील. तर अन्य बँकांचे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरांमध्ये 3 आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत एटीएम ट्रान्जॅक्शन मिळतात. 1 जानेवारी 2022 पासून हे शुल्क आकारले जातील.