एक्स्प्लोर

India Vs China : पाकिस्तान नव्हे तर चीनच भारताचा शत्रू नंबर 1, अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्सच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय? 

US Defence Intelligence Annual Report : चीनचा धोका कमी करण्यासाठी भारत विविध देशांसोबत हिंद महासागरात सराव, प्रशिक्षण, शस्त्रास्त्र विक्री करत मैत्री वाढवत आहे असं अमेरिकेच्या अहवालात म्हटलं आहे. 

मुंबई : अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीने त्यांच्या सरकारला एक अहवाल सादर केला. जगात कुठे काय सुरु आहे, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होणार याचं विश्लेषण अशा अहवालात केलं जातं. त्यात भारत पाकिस्तानचे ताणलेले संबंध, 7 ते 10 मे या काळात झालेले युद्ध, चीनची पाकिस्तानवर होणारी लष्करी आणि आर्थिक मदतीची खैरात अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे. भारत चीनला मुख्य प्रतिस्पर्धी मानतो हे सुद्धा त्या अहवालात म्हटलं आहे.

भारताच्या दृष्टीनं चीनच प्रमुख शत्रू आहे, चीनच्या तुलनेत पाकिस्तान दुय्यम समस्या आहे असं भारत मानतो असं निरीक्षण अमेरिकेतील डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या ताज्या अहवालात नोंदवलं आहे. या अहवालात पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचा उल्लेखही करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यावर आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर पंतप्रधान मोदींचा भर राहील असं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. 

जगभरात कोणत्या देशात काय सुरु आहे, कुठे तणाव आहे, कुणाला कोणापासून धोका आहे, कोणते देश जवळ येत आहेत अशा गोष्टींचा उल्लेख अमेरिकेच्या या अहवालात केला जातो. 

US Defence Intelligence Annual Report : अमेरिकेच्या अहवालात काय म्हटलंय?

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संरक्षणविषयक तीन प्रमुख गोष्टींना प्राधान्य राहील. 
  • जागतिक स्तरावर नेतृत्व करणे, चीनच्या कुरापतींवर मात करणे आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर मोदी सरकारचा भर असेल.
  • भारत चीनलाच आपला प्रमुख शत्रू मानतो. पाकिस्तान ही भारतासाठी काहीशी दुय्यम समस्या आहे. 
  • चीनचा धोका कमी करण्यासाठी भारत विविध देशांसोबत हिंद महासागरात सराव, प्रशिक्षण, शस्त्रास्त्र विक्री आणि माहिती शेअर करत मैत्री वाढवत आहे. 
  • इंडो-पॅसिफिक भागात भारत द्विपक्षीय, त्रिपक्षीय सहभाग वाढवत आहे. 
  • ब्रिक्स, शांघाय कोऑपरेशन ऑरगनायजेशन आणि आसियान सारख्या बहुपक्षीय मंचांवर भारत सक्रिय सहभाग वाढवत आहे. 
  • संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर, 'मेड इन इंडिया' वर भारताचा भर कायम असेल.
  • 2025 मध्ये देखील भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल.
  • आर्थिक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रशिया भारताचा महत्त्वाचा मित्र आहे. 
  • मोदी सत्तेत आल्यापासून भारतानं रशियाकडून लष्करी सामग्री घेणं कमी केलं आहे. 
  • चीन-पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारत रशियन बनवाटीचे रणगाडे, लढाऊ विमानांवरच अवंलबून आहे. 
  • त्यांच्या देखरेखीसाठी सुटे भाग मिळवण्यासाठी रशियासोबत चांगले संबंध असणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. 
  • रशिया-चीनमध्ये वाढती जवळीक जास्त घट्ट होऊ नये यासाठी भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल. 

चीनच्या आर्थिक आणि मिलिटरी खैरातीवर पाकिस्तान तगून राहील आणि चीनच्या जोरावर आपला भारताविरोध कायम राखेल असंही अहवालात म्हटलं आहे. प्रत्येक खंडातील, प्रत्येक देशाची संरक्षण सज्जता कशी आहे, शेजारी देशांशी संबंध कसे आहेत, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होईल याचा बारकाईने अभ्यास केलेला या अहवालातून दिसून येतं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget