अर्बन को-ऑपरेटिव्ह आणि मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती
शेड्यूल बँकांप्रमाणेच सहकारी बॅंकांसाठी आरबीआयला आपले अधिकार वापरता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आल्याने 1540 सहकारी बँकेतील खातेदारांना याचा फायदा होणार आहे.
नवी दिल्ली : अर्बन को-ऑपरेटिव्ह आणि मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली येणार आहे. मोदी सरकारने आज तसा अध्यादेश जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं की, 1482 शासकीय आणि नागरी सहकारी बँका आणि 58 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या आहेत. शेड्यूल बँकांप्रमाणेच सहकारी बॅंकांसाठी आरबीआयला आपले अधिकार वापरता येणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आल्याने 1540 सहकारी बँकेतील खातेदारांना याचा फायदा होणार आहे. या बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या 8.6 कोटी खातेदारांना त्यांच्या जमा असलेल्या 4.84 कोटी रुपये सुरक्षित राहणार आहेत, असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
VIDEO | अर्बन को-ऑपरेटिव्ह आणि मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली, प्रकाश जावडेकरांची माहितीThe decision to bring 1,540 cooperative banks under RBI's supervision will give an assurance to more than 8.6 crore depositors in these banks that their money amounting to Rs 4.84 lakh crore will stay safe: Union Minister Prakash Javadekar https://t.co/IAy0GN98el
— ANI (@ANI) June 24, 2020