एक्स्प्लोर

NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी

UPSC NDA II Exam Date : एनडीए परीक्षेचा अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी यूपीएससीने हेल्पलाईन नंबर दिला आहे. परंतु तो बंद असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. 

UPSC NDA 2 Exam 2026 : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (NDA) आणि 'नेवल अकॅडमी' (NA) परीक्षा (II) 2026 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा 9 जून रोजी शेवटचा दिवस आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीचे अधिकृत सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

एनडीएच्या परीक्षेसाठी 9 जून रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील तसेच देशभरातील अनेक इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी यूपीएससीने अर्ज भरण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ (Date Extension) द्यावी, अशी आक्रमक मागणी केली आहे.

Students Complaints On NDA Exam : हेल्पलाईनही बंद, विद्यार्थ्यांचा आरोप

उमेदवारांनी सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून यूपीएससीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीची वेबसाईट अत्यंत संथ गतीने चालत असून वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. सर्व्हर योग्य रीतीने काम करत नसल्यामुळे एका विद्यार्थ्याला संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल 1 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी यूपीएससीने दिलेला 'हेल्पलाईन डेस्क नंबर' देखील लागत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील सायबर कॅफेमध्ये तासंतास बसूनही शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अपूर्ण राहिले आहे.

UPSC NDA Exam Details : परीक्षेचे महत्त्व आणि पात्रता

संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एनडीए ही देशातील अत्यंत मानाची परीक्षा मानली जाते. 

पात्रता आणि वयाची अट : ही परीक्षा सध्या 12 वीत शिकत असलेले (Appearing) किंवा 12 वी पास झालेले विद्यार्थी देऊ शकतात. यासाठी उमेदवाराचे वय 16.5 ते 19.5 वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.

दोन टप्प्यांत परीक्षा : या परीक्षेत एकूण दोन मुख्य टप्पे असतात. पहिला टप्पा 900 गुणांची लेखी परीक्षा (Written Exam) आणि दुसरा टप्पा 900 गुणांची अत्यंत खडतर एसएसबी मुलाखत (SSB Interview) असा असतो.

अधिकारी पदावर निवड : या 1800 गुणांच्या प्रक्रियेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतीय संरक्षण दलामध्ये थेट वर्ग-1 चे अधिकारी (Officer Cadre) म्हणून निवड होते. यामध्ये आर्मी (Lieutenant), नेव्ही (Sub-Lieutenant) आणि एअरफोर्स (Flying Officer) या पदांचा समावेश आहे.

National Defence Academy Exam Date : 13 सप्टेंबर रोजी होणार परीक्षा, मुदतवाढीकडे लक्ष

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, ही परीक्षा वर्षभरातून दोन वेळा (एप्रिल आणि सप्टेंबर) घेतली जाते. भारतातून साधारण 5 ते 6 लाख विद्यार्थी प्रत्येक परीक्षेला अर्ज करतात. या वेळची राष्ट्रीय पातळीवरील लेखी परीक्षा 13 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर एकाच दिवशी घेतली जाणार आहे. '

कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस' (CDS 2) ची देखील अंतिम तारीख आहे. आता विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यूपीएससी मुदतवाढ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget