नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) 10 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in पाहता येणार आहे. 


यूपीएससीच्या वेबसाईटवर हा निकाल पीडीएफ स्वरुपात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये यशस्वी उमेदवाराचे नाव, रोल नंबर प्रकाशित करण्यात येणार आहे. आयोगाच्या 'What's New' या सेक्शनमध्ये मिळणार आहे. या यादीत केवळ यशस्वी विद्यार्थ्यांची नावंच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे या यादीत जर नाव नसेल तर तो विद्यार्थी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही.


जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या हॉल टिकीट डाऊनलोड करता येणार आहे. यंदाच्या 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या वर्षी 712 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


यूपीएससी 2020 चा अंतिम निकाल काही महिन्यांपूर्वीच लागला आहे. त्यामध्ये एकूण 761 उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला यशस्वी झाल्या आहेत. त्यामध्ये शुभम कुमार पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वा रँक मिळवली आहे.


महत्वाच्या बातम्या :