![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
यूपीएससीच्या 4 ऑक्टोबरला होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र बदलून मिळावित अशी मागणी उमेदवारांकडून होत होती. 7 जुलै ते 13 जुलैदरम्यान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि 20 जुलै ते 24 जुलै संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उमेदारांना यूपीएसएसीच्या वेबसाईटवर जाऊन आपलं सोयीचं परीक्षा केंद्र अपडेट करायचं आहे.
![यूपीएससीच्या 4 ऑक्टोबरला होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार UPSC allows candidates to change their centers for civil services preliminary examination, scheduled on October 4 यूपीएससीच्या 4 ऑक्टोबरला होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/05214329/upsc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 5 जून 2020 रोजी प्रकाशित केलेल्या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम/ वेळापत्रकानुसार देशभर 4 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय लोकसेवा (पूर्व) परीक्षा 2020 आणि भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा आयोजित केली आहे.
नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, 2020 साठी (भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा, 2020 सह) उमेदवारांची मोठी संख्या आणि केंद्रामध्ये बदल करण्याकरिता उमेदवारांकडून आलेले विनंती अर्ज लक्षात घेऊन आयोगाने उमेदवारांना त्यांच्या आधीच्या केंद्रात बदल करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 आणि भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 साठीची केंद्रे बदलण्याचा पर्यायही उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अतिरिक्त उमेदवारांना सामावून घेण्याच्या केंद्राच्या अतिरिक्त क्षमतेनुसारच उमेदवारांच्या केंद्रात बदल करण्याच्या विनंतीवर विचार केला जाईल.
उमेदवारांचे सुधारित निवड केंद्रे सादर करण्यासाठीची सुविधा आयोगाच्या https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दोन टप्प्यात म्हणजे 7 ते 13 जुलै, 2020 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) आणि 20-24 जुलै, 2020 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) सुरु राहील. ज्या उमेदवारांना केंद्र निवडीत बदल करायचे आहेत त्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन वरील परीक्षांच्या केंद्रांच्या निवडीत बदल करावेत.
केंद्रात बदल करण्याची उमेदवारांची विनंती 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्यट या तत्त्वाच्या आधारे विचारात घेतली जाईल आणि एकदा एखाद्या विशिष्ट केंद्राची क्षमता पूर्ण झाल्यानंतर ते केंद्र बंद केले जाईल. ज्या उमेदवारांना कमाल मर्यादेमुळे त्यांच्या आवडीचे केंद्र मिळू शकत नाही त्यांनी उर्वरित केंद्रांमधून केंद्र निवडणे आवश्यक आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग 1 ते 8 ऑगस्ट, 2020 दरम्यान आयोगाचे संकेतस्थळ https://upsconline.nic.in वर उमेदवारांना अर्ज रद्द करण्याची विंडो देखील उपलब्ध करुन देणार आहे. एकदा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतर भविष्यात कोणत्याही परिस्थितीत तो अर्ज पुन्हा स्वीकारला जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)