UPI Merchant Transactions Is Chargeble: दोन दिवसांतच म्हणजेच, 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष (New Financial Year) सुरू होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात आता UPI व्यवहार (UPI Transaction) देखील महाग होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट्सबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये 1 एप्रिलपासून UPI ​​द्वारे केलेल्या व्यापारी पेमेंटवर PPI शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे.


किती आकारलं जाणार जास्तीचे शुल्क?


 नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मंगळवारी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, NPCI ने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच, PPI वर शुल्क लागू करण्याची तयारी केली आहे. हे शुल्क 0.5-1.1 टक्के लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. परिपत्रकात, UPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के व्यवहार शुल्क (Transaction Charge)  लागू करण्याची सूचना करण्यात आली आहे. हे शुल्क युजर्सना व्यापारी पेमेंट्सवरच भरावं लागणार आहे.  


जवळपास 70 टक्के व्यवहार 2000 रुपयांहून अधिक 


NPCI च्या परिपत्रकातून असे संकेत मिळतात की, 1 एप्रिलपासून तुम्ही UPI पेमेंट म्हणजेच, Google Pay, Phone Pe, bharatpe,  आणि Paytm सारख्या डिजिटल माध्यमातून 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुमच्याकडून त्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. अहवालानुसार, UPI P2M व्यवहारांपैकी सुमारे 70 टक्के व्यवहार 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आहेत, अशा परिस्थितीत 0.5 ते 1.1 टक्के व्यवहार शुल्क 1 एप्रिलपासून आकारलं जाणार आहे.  


30 सप्टेंबरपूर्वी पुनरावलोकन केले जाईल


दरम्यान, PPI मध्ये वॉलेट किंवा कार्डद्वारे व्यवहार होतो. इंटरचेंज फी सामान्यतः कार्ड पेमेंटशी संबंधित असते. व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी हे शुल्क लागू केलं जातं. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, 1 एप्रिलपासून हा नवा नियम लागू केल्यानंतर 30 सप्टेंबर 2023 पूर्वी त्याचे पुनरावलोकन केलं जाईल.


दोन हजारापेक्षा अधिक व्यवहारावर मोजावे लागणार 20 रुपये 


दोन हजारापर्यंतच्या व्यवहारावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र दोन हजारापेक्षा अधिक रुपयांचा  व्यवहार केल्यास तुम्हाला 20 रुपये 20 पैसे शुल्क भरावे लागणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 100 रुपयांना 1 रुपये 1 पैसे शुल्क भरावे लागणार आहे


इंटरचेंज फी कशावर लागू होणार? 


नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) नं वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे इंटरचेंज शुल्क सेट केले आहेत. शेती आणि टेलीकॉम सेक्टरमध्ये सर्वात कमी इंटरचेंज शुल्क आकारलं जाईल. दरम्यान, इंटरचेंज फी फक्त मर्चंट ट्रान्जॅक्शनवर आकारली जाईल. या परिपत्रकानुसार, पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (P2PM) मधील बँक खातं आणि पीपीआय वॉलेटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.