एक्स्प्लोर

'बॉर्डर'सिनेमादरम्यान जळीतकांड, 20 वर्षांनी गोपाळ बंसलला शिक्षा

नवी दिल्ली: तब्बल वीस वर्षांपूर्वी 'बॉर्डर' सिनेमा सुरु असताना दिल्लीतील उपहार सिनेमा हॉल जळीत कांड प्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने आज बिल्डर-डेवलपर गोपाळ बंसल यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेपैकी चार महिन्यांची शिक्षा बंसल यांनी सुनावणीदरम्यान भोगलेली आहे. त्यांना आता फक्त आठ महिन्यांची शिक्षा पूर्ण करायची आहे. या प्रकरणी बंसल यांना दोन वर्षांपूर्वी सुनावण्यात आलेल्या 30 कोटी रूपयांच्या दंडाच्या शिक्षेत मात्र कसलीही सवलत देण्यात आलेली नाही. बंसल यांना शिक्षा भोगण्यासाठी कोर्टापुढे शरण येण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. गोपाळ बंसल यांना यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2015 साली सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कमी करत फक्त 30 कोटी रूपये दंड भरण्याचा निर्णय दिला होता. त्यावर खूप मोठी टीका झाली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जुन्या निर्णयाचा फेरविचार करत, बहुमताने म्हणजे दोन विरूद्ध एक बंसल यांना एक वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. या जळीतकांड प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांच्या वतीने लढणाऱ्या संघटनेने मात्र अतिशय उद्वीग्न अशी प्रतिक्रिया दिली. उपहार जळीत कांड प्रकरणी न्यायासाठी कोर्टात येणं हीच सर्वात मोठी चूक असल्याचं मत नीलम कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केलं. न्यायव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. 1997 मध्ये उपहार सिनेमाहॉलमध्ये बॉर्डर सिनेमा सुरू असताना लागलेल्या आगीत तब्बल 59 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी पुरेशी सुविधा नव्हती किंवा अग्नीशमन यंत्रणेचे किमान निकषही बिल्डर-डेव्हलपर बंसल यांच्या उपहार सिनेमा हॉलमध्ये पूर्ण करण्यात आले नव्हते, यामुळे दिल्ली हायकोर्टाने या जळीतकांडानंतर झालेल्या जीवित हानीसाठी बिल्डर बंसल यांना जबाबदार ठरवलं होतं. दोन वर्षापूर्वी म्हणजे 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्णयात बंसल यांना सुनावण्यात आलेली तुरूंगवासाची शिक्षा पूर्णपणे माफ करत फक्त 30 कोटी रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
मोबाईल उत्पादनात भारत देणार चीनला टक्कर!  62 हजार 500 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी, 60 हजार रोजगारांची निर्माण होणार 
मोबाईल उत्पादनात भारत देणार चीनला टक्कर!  62 हजार 500 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी, 60 हजार रोजगारांची निर्माण होणार 
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Embed widget