ट्रेंडिंग
उत्तर प्रदेश पोलिसांचं प्रियंका गांधींशी गैरवर्तन; सर्वच स्तरातून टीकेची झोड
यूपी पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केली. त्यावेळी प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केली. यावेळी एक पोलीस प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचे कपडे खेचताना दिसत आहे.
लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी निघाल्या होत्या. यावेळी यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींनी गैरवर्तन केल्याचा एक फोटो समोर आला आहे. कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक फोटा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दिल्ली आणि नोएडा प्लायओव्हरवर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केली. त्यावेळी प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केली. यावेळी एक पोलीस प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचे कपडे खेचताना दिसत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृत्याबद्दल देशभर पडसाद उमटू लागले आहेत.
अलका लांबा यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर करत,, मी निशब्द आहे... असं म्हटलं आहे.
राज्यातही नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही.
शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनीही ट्वीट करत, योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाही का? असा सवाल उपस्थित केला.
यूपी पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरस येथे जाण्यास परवानगी दिली होती. पण दरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मात्र काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांसोबत जाण्यावर ठाम होते. त्यावेळई यूपी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केली. त्यावेळी प्रियंका गांधी स्वत: कारमधून खाली उतरल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पुढे आल्या. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी पोलिसांची काठीही पकडली.
संबंधित बातम्या