नवी दिल्ली : हाथरस प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. यूपीच्या सीएम कार्यालयाच्या वतीने ट्विट केले की, "मुख्यमंत्री योगी यांनी सीबीआयला संपूर्ण हातरस प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत."


यूपीचे डीजीपी आणि गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी पीडितेच्या कुटुंबाशी भेट घेतली होती आणि त्यांच्या तक्रारी आणि त्यांच्या मागण्या ऐकल्या आहेत. कुटुंबाची भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवल्या, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यापूर्वी यूपी सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांवर त्यांचा विश्वास नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.


राहुल-प्रियंका यांची पीडित कुटुंबाला भेट


विशेष म्हणजे, यूपी सरकारचा हा आदेश त्यावेळी आला जेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडित कुटुंबाला भेटत होते. राहुल आणि प्रियंकाने पीडित कुटुंबाशी सुमारे एक तासभर संवाद साधला आणि त्यांची व्यथा त्यांच्याबरोबर मांडली.


राहुल गांधी 35 खासदारांसह हाथरससाठी रवाना; पीडित कुटुंबाला भेटणार


चर्चेनंतर राहुल गांधी म्हणाले, "आम्ही पीडित कुटुंबासमवेत आहोत. सरकार त्यांना घाबरवत आहे, त्यांना धमकावत आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यूपी सरकार सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. कुटुंबाला धमकावून त्यांची सही घेतली आहे. तर पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "पीडितेच्या कुटुंबाला न्यायालयीन चौकशी हवी आहे. कुटुंबाला मुलीचा चेहरादेखील दिसू शकला नाही. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार आहे."


"She was raped" says victim's brother | बहिणीवर बलात्कार झाला,पीडितेच्या भावाची प्रतिक्रिया #Hathras