UP Election Result 2022 : देशातील पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यात देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप 263 जागांवर तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष 135 जागांवर आघाडीवर आहे. बसपा एक आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
MY फॅक्टर म्हणजे काय?
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचा MY फॅक्टर समाजवादी पक्षाच्या MY फॉर्म्युल्याला भारी पडला आहे. भाजपचा MY फॅक्टर म्हणजे मोदी आणि योगी असा आहे. तर समाजवादी पक्षाचा MY फॉर्म्युल्याला म्हणजे मुस्लिम व यादव असा आहे. मुस्लिम-यादव फॉर्म्युल्याच्या मदतीने समाजवादी पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये राजकारण करत आहे. समाजवादी पक्षाचे मुस्लिम आणि यादव हे पारंपरिक मतदार असल्याचे मानले जात आहे. परंतु, या निवडणुकीत पंतप्रधान मोदींची प्रतिमा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीने राज्याच्या राजकारणात अनेक दिवसांपासूनचा समाजवादी पक्षाच्या फॉर्म्युल्याचा प्रभाव कमी केला आहे.
योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून आले आहेत. पंतप्रधान मोदी हे प्रथम आरएसएसोबत होते, तर योगी कधीही आरएसएसचा भाग बनले नाहीत. गोरखपूरमध्ये योगी यांचा हिंदू युवा वाहिनी नावाचा एक गट आहे. पंतप्रधान मोदींनंतर लोकप्रिय नेता म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांच्या जोडीने यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा सुखकर केला आहे. गेल्या पाच वर्षात योगी आदित्यनाथ यांची मतदारांमध्ये लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. याशिवाय उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेमुळे जनतेची मते आपल्याकडे खेचण्यातही भाजपला यश आले आहे.
योगी आदित्यानाथ यांच्या लोकप्रियतेसह केंद्रीय योजनांची उत्तर प्रदेशमध्ये अंमलबजावणी करणे भाजपसाठी गेम चेंजर ठरले आहे. उज्ज्वला, पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी या योजनांचा महिलांना फायदा झाला आहे. या निवडणुकीत भाजपला याच योजनांचा चांगला फायदा झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील निकाल अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. समाजवादी पक्ष 300 ते 400 जागा जिंकण्याचा दावा करत होता. परंतु, हा पक्ष 150 जागाही जिंकू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या
- Election Results 2022 : पाच राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले...
- UP Election Result 2022 : गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा, रायबरेली आणि अमेठीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा