एक्स्प्लोर

UP Election 2022: योगींना धक्क्यांवर धक्के! तीन दिवसांत 3 मंत्री, 8 आमदारांचे राजीनामे

UP Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. पण उत्तर प्रदेशकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे. मागील तीन दिवसांत उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. तीन दिवसांत तीन मंत्री आणि आठ आमदारांनी भाजपला रामराम केला आहे. त्यामुळे निवडणूकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. भाजपसाठी ही चिंतेची गोष्ट मानली जात आहे. 

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. प्रचारालाही सुरुवात झाली आहे. असे असतानाच भाजपला आतापर्यंत 14 नेत्यांनी रामराम केलाय. गुरुवारी सत्ताधारी भाजपमधील मंत्री धर्म सिंह सैनी यांनी राजीनामा दिलाय. धर्म सिंह सैनी यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी बातचीत केली आहे. ते समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी बुधवारी दारा सिंह चौहान आणि मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनीही अखिलेश यादव यांच्याशी बातचीत केली होती. याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.  
 
आतापर्यंत यांनी केलाय भाजपला रामराम -
1.स्वामी प्रसाद मौर्य
2.भगवती सागर
3.रोशनलाल वर्मा
4.विनय शाक्य-
5.अवतार सिंह भाड़ाना
6.दारा सिंह चौहान
7.बृजेश प्रजापति
8.मुकेश वर्मा
9.राकेश राठौर
10.जय चौबे
11.माधुरी वर्मा
12.आर के  शर्मा
13. बाला अवस्थी
14 धर्म सिंह सैनी

उत्तर प्रदेशमध्ये जातीय समीकरणाला महत्व
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राइतकंच जातीय समीकरणांचं महत्व आहे. तिथं ओबीसी समाजाचं अनेक मतदारसंघांमध्ये वर्चस्व आहे. तर काही मतदारसंघांमध्ये याच मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांचं जाण्यानं भाजपला फटका बसणार की मोदी-योगींच्या झंझावातासमोर त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे 10 मार्चलाच कळेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
Missing Link Landslide: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा घ्यायला विश्वासू शिलेदार पाठवला, शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
फडणवीसांचा विश्वासू शिलेदार मिसिंग लिंकवर पोहोचला,शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
Embed widget